Sunday 3 September 2023

लाल बावटा शेतमजूर युनियन राज्यभर विस्तार करण्याचा राज्य बैठकीत निर्णय !!

लाल बावटा शेतमजूर युनियन राज्यभर विस्तार करण्याचा राज्य बैठकीत निर्णय !! 

*जळगाव जिल्हा अधिवेशन 1ऑक्टोबर चोपडा ला होणार*

चोपडा, प्रतिनिधी.. लालबावटा शेतमजूर युनियनची विस्तारित राज्य काऊसिल मीटिंग मुंबई येथे भूपेश गुप्ता भवन येथे  युनियनचे राज्य अध्यक्ष काँ नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच  घेण्यात आली. त्या बैठकीला सर्वश्री कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ अमृत महाजन, हौसलाल रहानगडाले, कॉ राम बाहेती, ईश्वर पाटील ह्या पदाधिकारी
शिवाय भाकपा सचिव कॉ सुभाष लांडे  माजी राज्य सचिव तुकाराम भस्मे, किसान सभेचे अध्यक्ष.का  हिरालाल परदेशी, आयटक राज्य सचिव कॉ श्याम काळे, उपस्थित होते 
या बैठकीत राष्ट्रीय सचिव कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी मागील राज्य काऊन्सिल बैठकीच्या रिपोर्ट दिला, सध्या महाराष्ट्रात 12 जिल्ह्यांमध्ये लालबावटा शेतमजूर युनियन कार्यरत अजून किमान 24 जिल्ह्यांमध्ये काम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच येत्या नोव्हेंबर 2023 मध्ये पाटणा येथे भारतीय खेत मजुर युनियन चे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहेत. त्याआधी महाराष्ट्राचे राज्य अधिवेशन ७/८ ऑक्टोबर 2023 मध्ये औरंगाबाद येथे घेणेत येत आहे ते यशस्वी करावे. असा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य अधिवेशना आधी जिल्ह्यात जिल्ह्यांची ही अधिवेशने घ्यावित असे ठरले‌.
 त्यानुसार जळगाव  जिल्हा अधिवेशन  1ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनासाठी प्रमुख आमंत्रित मार्गदर्शक राज्य सचिव शिवकुमार गनविर राहणार मित्र शेतमजूर संघटनेचे प्राध्यापक प्रकाश चौधरी मार्गदर्शन करणार आहेत या अधिवेशनात जंगल गायरान वन जमीन नावे करा घरकुल साठी पाच लाख रुपये दिले रोजगार हमीची काम नियोजन करा शेतमजुरांना 5000 रुपये पेन्शन द्या आदि मागण्यांच्या चर्चा होणार आहे व आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार आहे असून सदर जिल्हा अधिवेशन चोपडा येथे घेण्यात येणार असून हे अधिवेशन यशस्वी व्हावे.म्हणून सर्व का श्री अमृत महाजन लक्ष्मण शिंदे भाकपा जिल्हा सचिव का डी एन पाटील,निर्मला शिंदे,प्रल्हाद एरंडे देविदास बोंदरडे  चाळीसगाव गोरख वानखेडे वासुदेव कोळी सुखदेव भील  लालचंद कोळी हिराबाई सोनवणे अंबालाल राजपूत विश्वास पाटील शांताराम पाटील, छोटू पाटील सुजात तडवी ,आरमान तडवी, गुरुदास मोरे, सर्व चोपडा वाल्मीक मैराळे  निलाबाई भिल्ल ,, रामकृष्ण भील सीताराम वडार प्रभुदास कसबे सर्व अमळनेर  बळीराम धीवर व गोकुळ कोळी जळगाव आदी प्रयत्न करीत आहेत.


No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...