Friday, 12 June 2026

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!
पुणे, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मार्जिन मनी योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५ टक्के रकमेपैकी जास्तीत जास्त १५ टक्के  सबसिडी (मार्जिन मनी) राज्य शासनामार्फत देण्यात येते. लाभार्थ्यांनी १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी वितरित करण्यात येते.

इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे  येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...