Saturday 2 September 2023

मराठी चित्रपटात 'नाच्याची, भूमिका अजरामर करणा-या गणपत पाटील यांच्या पत्नीने कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास !

मराठी चित्रपटात 'नाच्याची, भूमिका अजरामर करणा-या गणपत पाटील यांच्या पत्नीने कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास !

मुंबई-ठाणे, (संजय कांबळे) :

गणपत पाटील म्हटलं की मराठी सृष्टीतील नाच्याची भूमिका अजरामर करणारे अभिनेते लगेचच आठवतात. गणपत पाटील यांना आपल्यातून जाऊन १४ वर्षे लोटली आहेत. त्यांच्या पश्चात काल १ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचेही दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाने कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कलाकार व गणपत पाटील यांच्या वर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी दु:ख व्यक्त करून श्रंध्दाजली वाहिली आहे.

काल शुक्रवारी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने प्रमिला पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. गणपत पाटील यांच्या संसाराचा गाडा प्रमिला मावशींनी आपल्या खांद्यावर पेलला होता. मान अपमान सहन करत आपल्या मुलांना त्यांनी वाढवलं होतं. कलाकार म्हणून त्यांनी गणपत पाटील यांना अखेरपर्यंत खंबीर साथ दिली होती. समाजातून मिळणारी वाईट वागणूक या सर्वांची पर्वा न करता नवऱ्याला त्यांनी कायम साथ दिली.खरं तर नाच्याच्या भूमिकेमुळे गणपत पाटील यांना समाजात वावरताना मोठा अपमान पचवावा लागला होता. कारण अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला एकेकाळी हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. मराठी सृष्टीत अशी भूमिका त्यांनी अजरामर केली. नटरंग या चित्रपटाने त्यांच्या भूमिकेचा सन्मान केला. पण हा सन्मान पाहायला गणपत पाटील हयातीत नव्हते ही खंत अनेकदा व्यक्त होते. गणपत पाटील यांनी बालवयातच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांना कुमारिकेची भूमिका मिळाली. चित्रपटातून त्यांनी खलनायक सुद्धा साकारला मात्र नाच्याची भूमिका त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरली.

त्यांना या भूमिकेमुळे ओळख मिळाली असली तरी खाजगी आयुष्यात मात्र त्यांच्या वाट्याला अवहेलना आली. मुलामुलींची लग्न जमवताना त्यांना नावे ठेवण्यात आली. या लोकांना मुलं कशी होतात असे प्रश्न पाहायला येणारी पाहुणे विचारू लागली तेव्हा गणपत पाटील हा किस्सा सांगताना भावुक झाले होते. या प्रवासात गणपत पाटील यांना पत्नी प्रमिला यांची साथ मिळाली. काल प्रमिला पाटील यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. *प्रमिला गणपत पाटील यांना आपल्या ग्रुप तर्फे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

*सौजन्य-महेश देशपांडे

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...