Saturday 2 September 2023

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम शाळेला मदत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन विकास समिती व माजी विद्यार्थी यांनी दिले आश्वासन !

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम शाळेला मदत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन विकास समिती व माजी विद्यार्थी यांनी दिले आश्वासन !

मुंबई, प्रतिनिधी, दि.2 - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम येथे दिनांक 31ऑगस्ट 2023 रोजी शाळा व्यवस्थापन विकास समिती सभा व माजी विद्यार्थ्यांची सभा पार पाडली. कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर, शिक्षक समाधान खैरनार सर, सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र पड्याळ - शिवसेना शाखाप्रमुख कुर्ला (प ), व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री ब्रिजेस अग्रवाल, उपाध्यक्ष - मितेश मिश्रा, मासूम संस्थेचे प्रोजेक्ट हेड -श्री संदीप शेलार, स्कूल लीडर - योगेश वीरकर सर, माजी विद्यार्थी -रुपेश गरड, सुंकप्पा कुंचिकोरवी, पालक- नागेश तसेच आजी माजी विद्यार्थी सभेस उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर यांनी सभेला संबोधित केले. आता मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत. रात्र शाळा टिकाव्यात, गोर-गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दिवसा कामधंदा करून रात्री रात्र शाळेत येऊन अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करता यावे, जो विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेश घेतो तो विद्यार्थी आपले स्वप्न घेऊनच येतो की, रात्र शाळेतून दहावी पास होऊन पुढील शिक्षण पूर्ण करेल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी पास चे स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणून शिक्षकांकडून कसून प्रयत्न केले जातात जादा तासिका घेतल्या जातात, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, गणिताचे अनेक उदाहरणे सोडवून घेणे या सर्व प्रयत्नातूनच इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल सलग चार वर्षे 100% लागत आहे. या निकालामुळे आमची रात्र शाळा परिसरात नावारूपाला आलेली आहे. या रात्र शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत असे आव्हान मुख्याध्यापकांनी या ठिकाणी केले. सभेसाठी आलेल्या सर्व सदस्यांनी रात्र शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. रात्र शाळेच्या वर्ग खोल्यांचे भाडे भरणे, शाळेला कपाट मिळवून देणे, प्रिंटर देणे इत्यादी गोष्टींसाठी मदत देण्याचे सभेत ठरले. शेवटी खैरनार सर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता केली.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...