Saturday 2 September 2023

जूनी पेंशन लागू करावी हेच शिक्षण क्रांती संघटनेचे ध्येय - सुधीर घागस

जूनी पेंशन लागू करावी हेच शिक्षण क्रांती संघटनेचे ध्येय - सुधीर घागस

डहाणू /पालघर, प्रतिनिधी, दि.०२ : पेंशन हाच कर्मचाऱ्याच्या भविष्याचा आधार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने नुकत्याच दिलेल्या निवाड्यात निवृत्तीवेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क असून शासनाला तो नाकारता येणार नाही हे स्पष्ट केले आहे. याच आधारावर शिक्षण क्रांती संघटना जूनी पेंशन हेच ध्येय ठेवून शासनाकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करून जूनी पेंशन मिळवणार असल्याचे शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. संघटनेच्या पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.
           डहाणू तालुक्यातील सौ. मुक्ता निवृत्ती जाधव महाविद्यालयात आज (दि.२ सप्टेंबर) रोजी शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. सभेमध्ये नियमित विषयांबरोबरच पदवीधर मतदार नोंदणी, जूनी पेंशन बाबत करावयाची आंदोलने या विषयांवर चर्चा करण्यात आली. जूनी पेंशन हाच कर्मचाऱ्याच्या म्हातारपणीचा आधार आहे, तो आधार आपल्या बांधवांना मिळवून द्यायचाच असा निर्धार सभेमध्ये उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
           सभेकरीता जिल्हा कार्याध्यक्ष शशीकांत ठाकूर, जिल्हा सचिव सुरेंद्रनाथ दुसाने, राज्य कार्यकारिणी सदस्य एस. जी. पाटील, वाडा तालुका सचिव शरद ठाकरे, डहाणू तालुका अध्यक्षा उषा चव्हाण, गोरख सुर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...