Saturday 2 September 2023

जालना जिल्ह्यातील मराठा समाजावरील पोलीसांच्या लाठिहल्याचा म्हारळ गावात मोर्चा काढून निषेध, सरकारच्या विरोधात घोषणा !!

जालना जिल्ह्यातील मराठा समाजावरील पोलीसांच्या लाठिहल्याचा म्हारळ गावात मोर्चा काढून निषेध, सरकारच्या विरोधात घोषणा !!

*मोर्चातील मोजक्याच उपस्थित वरून उलट सुलट चर्चा*

कल्याण, (संजय कांबळे) : काल जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे जे उपोषण सुरू होते, त्या दरम्यान झालेल्या अमानुष लाठिचार्ज चा आज कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात मोर्चा काढून निषेध नोंदवला, यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तर उपस्थित समाजाच्या संख्येवरून म्हारळ गाव व परिसरात इतकेंच समाजबांधव आहेत का ? अशी चर्चा ऐकायला मिळत होती.

मराठा समाजाला  आरक्षण मिळावे म्हणून या समाजाने गेली अनेक वर्षे शांततेत मोर्चे काढले आहेत. तर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी हे उपोषण करत होते, गेली चारपाच दिवसापासून हे उपोषण सुरू आहे.असे असताना काल अचानक उपोषण स्थळी पोलीस बळाचा वापर करून उपोषण कर्ते व समाजावर पोलिसांनी तूफान लाठीचार्ज केला, 

जमावावर गोळीबार व अक्षुधूराचा वापर केला असा आरोप जरांगे यांनी केला. यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले. जालना, बीड धाराशिव, कोल्हापूर येथे समाज आक्रमक झाला, जालण्यात बस पेटवण्यात आल्या,
पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये अनेक वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांन अमानुष मारहाण झाल्याने समाज आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध केला. शिंदे -फडणवीस यांच्या विरोधात समाजात भंयकर अंसतोष निर्माण झाला आहे.

असे असताना कल्याण शहर व ग्रामीण भाग मात्र शांत दिसत होता. यावरून या परिसरात मराठा समाचे नागरिक नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु म्हारळ गावातील शिवशंभू प्रतिष्ठान यांनी काही मोजक्याच लोकांना घेऊन विठ्ठल नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते म्हारळ ग्रामपंचायत प्रवेशद्वार इथपर्यंत मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी येथे जालणा येथील घटनेचा निषेध व्यक्त करणारा बँनर लावण्यात आला. यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने सरकार चा निषेध नोंदवला. यावेळी  कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी चोख नियोजन केल्याने केवळ समाजाचे मोजकेच लोक येथे दिसत होते. यावरून म्हारळ सोसायटी परिसरातील एक समाजसेवकाने  प्रश्न उपस्थित केला की, इतर वेळी मराठा समाजाचे शेकडो नेते व पुढारी दिसतात मात्र,यावेळी ते कुठे गेले? त्यामुळे परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून त्यांच्या अनुपस्थितीचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...