Friday 1 September 2023

आंबेत पुलाचा कठाडा कोसळला !!

आंबेत पुलाचा कठाडा कोसळला !! 

*संतोष अबगुल यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा*

आंबेत प्रतिनीधी:- गणेश नवगरे, आंबेत महाड मंडणगडला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतीम टप्यात आलेले असताना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सांयकाळी आठ वाजण्याचे दरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने त्यांचे आधारावर उभे करण्यात आलेल्या नवीन स्लाबचे गर्डर करिता लावण्यात आलेले सेंटरीग कोसळून सावित्री नदीच्या पात्रात पडले. त्यामुळे गणेशोत्सवाची आधी पुलाचे काम पुर्ण होवून तो वाहतूकीसाठी खुला होण्याच्या सर्व शक्यता मावळल्याने मंडणगड तालुक्यातील नागरीकांची नाराजी विविध माध्यमातून व्यक्त होवू लागली आहे. गेल्या एक वर्षापासून आंबेत कडील बाजूने दुसऱ्या क्रमांकाचा पिलरचे दुरुस्तीचे काम सार्वजनीक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून सुरु आहे.

या संदर्भात तालुक्यातील विविध संस्था, सामाजीक संघटना, व राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन करीत पुल लवकारत लवकर सुरु कऱण्याची मागणी केल्यानंतर आवश्यक तो वेळ घेऊन बांधकाम विभागाने ऑगस्ट महिन्यात म्हाप्रळ आंबेत पुल गणेशोत्सवाचे आधी सुरु करण्याचे जाहीर केले होते तसे कामही सुरू केले होते. परंतु जुन्या पिलरला पिर्याय म्हणून बाजूने आठ नवीन पाईल उभे करण्यात आले होते. त्यावर पाईल कँप टाकल्यानंतर गर्डरचे काम सुरु असताना गर्डर साठी बांधण्यात आलेले सेटंरीग, काम सुरु असताना कोसळले. गुरुवारी सायकांळचे सुमारास अचानक घडलेल्या नवीन घटना क्रमामुळे नियोजीत वेळेत काम पुर्ण होणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. जुन्या पिलरचे काही भागाचे कोसळण्याचे आवाजामुळे परिसरात एकच घबराट उडाली होती या विषयी समाज माध्यमात उलट सुलट चर्चा सुरु असल्याने वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाचे महाड येथील कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे मंडणगडकरांच्या अपेक्षा लांबल्या आहेत, या संदर्भात संतोष अबगुल यांनी नविन पुल बांधण्यात यावा असे साडेतीन हजार सह्यांचे पत्र मुख्यमंञी एकनाथ शिंदे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, सार्वजनिक मंञी रविंद्र चव्हाण व प्रशासकिय अधिकार्यांना दिले आहेत. या बाबत माध्यमांशी बोलताना संतोष अबगुल म्हणाले या बाबत पुल लवकर नाही झाला तर न्यायालयात याचिका देखिल करणार असे म्हणाले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...