Thursday 7 September 2023

संपर्क फांऊंडेशन ची कौतुकास्पद कामगिरी ठाणे जिल्ह्यात सहाशे त्रेषस्ट संपर्क टिव्ही डिव्हाईस तर कल्याण तालुक्यात अठ्याऐंशी टिव्ही डिव्हाईस !

संपर्क फांऊंडेशन ची कौतुकास्पद कामगिरी ठाणे जिल्ह्यात सहाशे त्रेषस्ट संपर्क टिव्ही डिव्हाईस तर कल्याण तालुक्यात अठ्याऐंशी टिव्ही डिव्हाईस !

कल्याण, (संजय कांबळे) : विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संपर्क फांऊडेशन या संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुमारे ६६३ टिव्ही डिव्हाईस तर कल्याण तालुक्यातील शाळांना १५० पैकी ८८ टिव्ही डिव्हाईस चे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील ८ शिक्षकांचा ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ रुपाली खोमणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न ,तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर जंयती दिन संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवल परिसरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संपर्क फांऊंडेशन या संस्थेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना 'संपर्क फांऊंडेशन अँवार्ड देऊन सन्मानित करणाचा कार्यक्रम कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील म्हारळ केंद्राततून जिल्हा परिषद शाळा कांबा, गोवेली मधून बेहरे, सोनारपाडा मधून नांदिवली पाडा तर खोणी केंद्रातील जिप शिक्षक व शिक्षिका यांना सन्मान चिन्ह देऊन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ रुपाल खोमणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संपर्क फांऊंडेशन चे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

संपर्क फांऊंडेशन च्या वतीने हा सोहळा करण्या मागचा उद्देश हा आहे की, जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी व पाया मजबूत समग्र शिक्षा अंतर्गत प्लान काम करणारी संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात ६६३ संपर्क टिव्ही डिव्हाईस तसेच १५० टिव्ही पैकी ८८ कल्याण तालुक्यातील जिप शाळांना डिजिटल शिक्षण मुलांना मिळावे यासाठी शिक्षक संपर्क टिव्ही चा मोलाचा वाटा आहे.

यावेळी फांऊंडेशन च्या वतीने संबंधित शिक्षकांना स्मृतिचिन्ह दैऊन सन्मानित करण्यात आले. याप्रंसगी संपर्क फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्याविषयी माहिती दिली तर गटशिक्षणाधिका-यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता रासमवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...