Monday 4 September 2023

भिवंडी शहरात दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू !!

भिवंडी शहरात दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू !!

भिवंडी, दिं,४,अरुण पाटील (कोपर) :
            भिवंडी शहरातील गौरीपाडा साहील हॉटेल परिसरात एका दोन मजली इमारतीचा काही भाग मध्यरात्री कोसळला. आतापर्यंत या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ ते ४ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये आठ महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी आहे. 

           शहराच्या गौरीपाडा धोबी तलाव इथल्या साहिल हॉटेल परिसरातील 'अब्दुल बारी जनाब' इमारत ४० वर्षांहून अधिक जुनी आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या श्रेणीत येते. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना असून वरचे दोन मजले निवासी आहेत. या इमारतीच्या मागील बाजूचा स्लॅब मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावरील कुटुंब ढीगाऱ्याखाली दबलं गेलं. जखमींना रिक्षातूनच रुग्णालयात नेलं. 
          घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलासह ठाणे येथील टीडीआरएफचं पथक बचाव कार्यासाठी पोहचलं. त्यानंतर बचाव पथकानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली दबलेल्या एकूण सात रहिवाशांना बाहेर काढलं. सुरवातीला रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यानं ढिगाऱ्याखालून काढलेल्या जखमी रहिवाशांना रिक्षातूनच रुग्णालयात नेण्यात आले. 
         अद्यापही ढिगाऱ्याखाली कोणी रहिवाशी दबले आहेत का, याचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त इमारत दाटीवाटीच्या परिसरात असल्यानं मदतकार्यात अडथळा येत आहे. सध्या घटनास्थळी इमारतीचा मलबा हटविण्याचं काम जारी आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...