Wednesday, 1 November 2023

नागपूर येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

नागपूर येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

मुंबई, उदय दणदणे : 

रविवार दिनांक २९ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघचे महायोगोत्सव २०२३ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संथापक डॉ. हेडगेवार भवन मध्ये संपन्न झाले!

योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा तर्फे नागपूर येथे महायोगोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र योगशिक्षक संघ हे राज्यातील योगशिक्षकांच्या हिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. योगशिक्षकांच्या अनेक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे महाराष्ट्र संघाचे मुख्य हेतू आहे. तसेच या महायोगोत्सव मध्ये अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा अध्यक्षांसोबतच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र राज्य मध्ये योग आयोग पारित व्हावे हे ठराव मंजूर करून घेतले, तसेच ह्या बाबतचे पत्रही लवकरच महाराष्ट्र योगशिक्षक संघाकडून शासनाकडे पाठविण्यात येईल अशी घोषणा केली.  दरवर्षी महायोगोत्सव साजरा करण्याचा मुख्य हेतू हाच असतो की राज्यातील सर्व योगशिक्षक एकाच छताखाली येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सदस्यांची ओळख होईल. 

ह्या दोन दिवसीय महायोगोत्सव मध्ये योग संबंधी अनेक व्याख्याने व योग आसनांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महायोगोत्सवात एकूण १२०० योगशिक्षक सदस्य उपस्थित होते, उपस्थित सदस्यांसाठी प्राणायाम, ष्टकर्म, सूर्यनमस्कार घेण्यात आले, तसेच काही महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून रिद्मिक योग, आर्टिस्टिक योग, मंगळागौर, पंढरीच्या वारीचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई जिल्ह्यातर्फे महायोगोत्सव मध्ये मंगळागौरच्या माध्यमातून योग आसनचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले, यावेळी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा व योग नृत्य दिगदर्शिका हेमवंता जिजाबाई, उपाध्यक्षा श्वेता पिसाळ, साक्षी कलगुटकर तसेच सचिव सुषमा माने, विजयालक्ष्मी शर्मा, अमित चिबडे, वर्षा शर्मा कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, लीगल प्रभारी ऍड. माया देसाई, मीडिया प्रभारी निलेश साबळे, संघटन सचिव विकास ओव्हाळ, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, कार्यालय सचिव जयदीप कनकिया, राज्य महिला प्रकोष्ठ प्रभारी सदस्य शर्मिला चंदा, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास शिर्के, पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद मिश्रा, मुंबई जिल्हा सदस्य कृष्णकुमार शिंदे, विष्णू सुतार, चंद्रकांत सदाफुले, मीनल काळे, रोहिणी सोनावणे, शालिनी भंडारी, गेयता कदम, प्रियांका खाडे, राधिका केतकर, मीना घनवट  व महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...