Friday, 1 December 2023

वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच माणुसकी जपण्यासाठी रक्तदान करून समाजसेवेला सुरुवात !!

वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच माणुसकी जपण्यासाठी रक्तदान करून समाजसेवेला सुरुवात !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर) :

         कोकण सुपुत्र राजापूर तालुक्यातील कु.ओंकार बाईंग या विरार मनवेलपाडा मुकुंद पद्मनगर वेल्फर असोसिएशन सोसायटीमध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहत असून  जन्मताच समाजसेवेची ओढ असलेला हा मुलगा नुकताच  १८ वर्षाचा झाला. ज्या वयात मुले -मुली मौज -मस्ती करतात, त्याच वयात या कोकणच्या सुपुत्रने समाजसेवेला सुरुवात केली आहे.आयुष्यातले पहिले रक्तदान रविवारी ( दि.२६ नोव्हेंबर २०२३) रोजी संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या भव्यदिव्य रक्तदान शिबीरात केले. श्री.संतोष दादा अबगुल आणि आयुष्यातील ५० वे रक्तदान करणारे देवदूत श्री.समीर दादा चव्हाण यांच्या या समाज कार्याला प्रेरित होऊन हे रक्तदान केल्याचे मत त्यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले. तर एवढेच नाही तर त्याच्या आई वडिलांनी देखील या वेळी रक्तदान केले. हे संपूर्ण कुटुंब या जनसेवेला समर्पित झाले.त्या बद्दल कु. ओंकार बाईंग यांला सर्व समाजातून शाबासकीची मिळत असून अनेकांनी यानिमित्ताने त्याचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कामाला शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...