Tuesday 16 January 2024

श्री गणेश मुर्तीकार संघटना आयोजित श्री गणेशमुर्ती प्रदर्शन स्पर्धेत बेलारी गावच्या वैभव सापते यांची मुर्ती व्दितीय क्रमांकाची मानकरी !!

श्री गणेश मुर्तीकार संघटना आयोजित श्री गणेशमुर्ती प्रदर्शन स्पर्धेत बेलारी गावच्या वैभव सापते यांची मुर्ती व्दितीय क्रमांकाची मानकरी !!

संगमेश्वर, (शांताराम गुडेकर) :
      
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील बेलारी गावातील वैभव सापते हा एक खेडेगावात राहणारा उमदा तरूण मुर्तीकार असून त्याला लहानपणापासून मुर्तीकामाची आवड आहे. माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्या नंतर त्याने डि कॅड कॅालेजचे प्राचार्य श्री.रणजीत मराठे यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी गाठली आणि आपल्या अंगी असलेली शाडू माती कला विकसित केली. गेल्या दोन वर्षापुर्वी त्यांनी आपल्या घरी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री नसताना मातीच्या मुर्ती कामाला सुरूवात केली. मागील वर्षी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शन स्पर्धेत सुध्दा त्याने आपल्या हस्त कौशल्यातून सुबक व रेखीव मुर्ती रंगकामाच्या साधन सामुग्री अभावी कोरी मुर्ती प्रदर्शित केली होती.त्या मुर्तीलाही  प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली होती. या वर्षी मात्र एक महिन्यापूर्वीच त्याने एकमुखी निर्णय घेऊन मुर्ती बनविण्याच्या कामाला सुरूवात केली. संघटना अध्यक्ष हुमणे गुरूजी यांचे गणेश मुर्ती कारखान्याचे सहकार्याने सुबक रंग काम करून स्पर्धेत सहभागही घेतला. प्रेक्षक, मान्यवर व परीक्षक यांनी त्या चित्राला उत्तम प्रतिसाद दिला. अटितटीच्या परीक्षणामध्ये श्री गणेश मुर्तीकार संघटना आयोजित आमदार शेखर निकम सर पुरस्कृत आमदार चषक श्री गणेशमुर्ती प्रदर्शन स्पर्धेत बेलारी गावच्या वैभव सापते यांच्या त्या चित्राला परीक्षकानी व्दितीय क्रमांक घोषित केला. त्यामुळे रोख रू. ५,५५५/- व आमदार चषक देऊन वैभव यांना गौरविण्यात आले. या यशस्वी नवख्या कलाकाराचे संघटना अध्यक्ष श्री.हुमणे गुरूजी, जिल्हाध्यक्ष बोरसुतकर गुरूजी, डि कॅडचे प्रचार्य मराठे सर, आर्तेसर, अशोक शेलार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अजित सापते, पो.पाटील प्रतिक शेलार यानी त्यांचे खास अभिनंदन केले. याशिवाय त्यांना हे पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल वैभव सापते यांना अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्यासीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द !

जिल्हा रुग्णालयात डायलेसिस उपचारासाठी आरसीएफच्या सीएसआर अंतर्गत आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द      रायगड, प्रतिनिधी :राष्ट्रीय के...