Saturday 6 January 2024

काँग्रेश चे नेते अनंता वनगा यांचा शिंदे गटात प्रवेश !!

काँग्रेश चे नेते अनंता वनगा यांचा शिंदे गटात प्रवेश !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

पालघर जिल्ह्यातील कॉग्रेसचे नेते अनंता वनगा यांनी आपल्या सोबत असलेल्या बुथ कार्यकत्यांंसोबत  गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेना ( शिंदे गट) या पक्षात जाहिर प्रवेश घेतला केला. अनंता वनगा हे पालघर/ठाणे जिल्ह्यातील एक खंबीर आदिवासी नेतृत्व आहे, त्यांनी आजपर्यत अनेक उपोषणे, आंदोलने करुन आदिवासी समाजाबरोबरच इतर समाजाला सुद्धा न्याय देण्याचे काम करतात, दांडगा जनसंपर्क असल्यामुळे अनंता वनगा हे सर्व सामान्य लोकांना चांगलेच परिचित आहेत,राजकारणा बरोबरच समाजकार्यात सुद्धा ते सक्रिय आहेत, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजुंना कपडे वाटप असे उपक्रमातुन खेड्यापाड्यातील नागरीकांना ते परिचीत आहेत, गेली १५ वर्ष ते पालघर जिल्ह्यामध्ये कॉग्रेस पक्षामध्ये सक्रिय पदाधिकारी म्हणुन काम करायचे परंतु पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळुन अनंता वनगा यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आपल्या कार्यकत्यांसोबत शिवसेना (शिंदे गट) या पक्षामध्ये जाहिर प्रवेश घेतला, अनंता वनगा हे सर्व सामान्य लोकांच्या सेवेशी रात्रंदिवस असतात याचा फायदा पालघर मध्ये शिवसेनेला ( शिंदे गटाला) होईल असे चित्र दिसते. त्यांच्या सोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते संजयजी भानुशाली,ऐनशेत ग्रामपंचायतचे सदस्य दयानंद हरल, देवघर ग्रामपंचायतचे सरपंच भरत सांबरे ,सरसऒहल ग्रामपंचायतचे सदस्य भरत इंदे, तसेच संतोष जांजर, वैभव भोमटे,  गुरुनाथ बसवंत, प्रकाश हरल, अनंता सरडे, महिला पदाधिकारी तसेच बुथ कमिट्यांच्या शंभर पदाधिकार्यांनी प्रवेश केला.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...