Wednesday 3 January 2024

केतन शहा यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी गुजराती सेलच्या अध्यक्ष पदी निवड !!

केतन शहा यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी गुजराती सेलच्या अध्यक्ष पदी निवड !!

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

           आगामी लोकसभा आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात काँग्रेस कमिटीने नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून विविध सेलच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत ही काँग्रेस कमिटी मध्ये बदल करण्यात आले असून काँग्रेस कमिटीच्या मुंबई विभागीय गुजराती सेलच्या अध्यक्ष पदी केतन शहा यांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी शहा यांना नियुक्तीचे पत्रक देऊन शुभेच्छा दिल्या.
           केतन शहा हे घाटकोपरचे रहिवाशी असून त्यांनी प्रभाग 127 मधून पालिका निवडणूक लढवली होती. 1995 पासून केतन शहा हे काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ईशान्य मुंबई जिल्हा कमिटीची जबाबदारी हाताळली आहे. स्थानिक व्यापारी आणि गुजराती बांधवाशी त्यांचा मोठा संबंध असून विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असते. काँग्रेसचा प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सध्या गुजराती व्यापारी वर्गात विविध समस्या बाबत नाराजी असल्याचे चित्र असून आगामी निवडणुकात काँग्रेस पक्षाकडे गुजराती मतदार केतन शहा यांच्या नियुक्तीमुळे वळू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
         यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना केतन शहा म्हणाले की मला पक्षाने मुंबई विभागीय जबाबदारी दिली असून माझ्यासाठी हा एक गौरव आहे. मी नक्कीच या पदाला न्याय देईल. गुजराती बांधवांसाठी विविध कार्यक्रम, त्यांच्या समस्या यावर सातत्याने लक्ष्य घालून मी काम करणार आहे. आगामी निवडणुकांत काँगेस पक्षाला जास्तीत जास्त विजय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे केतन शहा म्हणाले.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...