Wednesday 3 January 2024

सेवा सोसायट्यांनी कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दि.15 जानेवारी पर्यंत सादर करावेत !!

सेवा सोसायट्यांनी कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव
दि.15 जानेवारी पर्यंत सादर करावेत !!


पनवेल , प्रतिनिधी : पेण तालुक्यातील कार्यक्षेत्र असणाऱ्या सोसायट्यांनी कामाची आवश्यकता असल्यास कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दि.15 जानेवारी 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.  

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या दि.11 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णया अन्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामांकरीता पत्र प्राप्त झाले आहे.

आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेले तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची, कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...