Monday 12 February 2024

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा कल्याण मधील पत्रकारांकडून निषेध !!

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा कल्याण मधील पत्रकारांकडून निषेध !! 

*राज्यपालांना दिले निवेदन*

कल्याण, (प्रतिनिधी) : पुणे येथील निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असलेले जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व त्यांच्या इतर सहकारी यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्ते यांनी भ्याड हल्ला केला होता, त्याचा कल्याण मधील पत्रकारांकडून निषेध करण्यात आला व राज्यपालांना निवेदन पोहच व्हावे, समस्त पत्रकारांच्या भावना कळाल्यावत म्हणून कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांना आज निवेदन देण्यात आले.

सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, भाजपा आमदारा़चा पोलीस ठाण्यात गोळीबार, घोसाळकरांची हत्या या ताज्या उदाहरणासह नुकतेच पुणे येथील निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असलेले जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, प्रसिद्ध वकील अँड असिम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्ते यांनी भ्याड हल्ला केला, वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, सुदैवाने ते यामधून वाचले.

विशेष म्हणजे हे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाच्या लोकांनी केले यावरुन कायद्याची भिती राहिली आहे का? हा खरा प्रश्न आहे, आपल्या एखाद्याचे विचार पटले नाही, किंवा काही भावना दुखावल्या असतील तर कायदेशीर मार्गाने जाता येते, मात्र येथे कायदाचा हातात घ्यायचा याचा अर्थ काय? एकीकडे पूरक लोकशाही करिता पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणून ओरडायचे तर दुसरीकडे त्यांचाच आवाज दाबायचा हे कोणत्या लोकशाहीत बसते, म्हणून याचा निषेध करण्यासाठी आज कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांना कल्याण मधील पत्रकारांकडून राज्यपाल महोदय यांच्या नावाने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचे निवेदन आज देण्यात आले, यावेळी जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष, पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, राजू काऊतकर, सुभाष शेंडगे, आदी पत्रकार उपस्थित होते, यावेळी आपल्या भावना राज्यपाल महोदय यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...