Monday 12 February 2024

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन !!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १६-१८ फेब्रुवारी रोजी सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन !!

ठाणे : उदय दणदणे

कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, सत्यवान यशवंत रेडकर - कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे नियोजित  वेळापत्रकानुसार निशुल्क मार्गदर्शन करणार आहेत__ 

■ शुक्रवार, १६ फेब्रुवारी २०२४ रोजी,सकाळी ८.३० वा., स.ह.केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवगड तसेच सकाळी ११.३० वा, माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर, देवगड

■ शनिवार, १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., एस.एल.देसाई विद्यालय, पाट, कुडाळ, तसेच दुपारी २.०० वाजता, रामेश्वर माध्यमिक विद्यालय, बांव, कुडाळ, 

■ रविवार, १८.फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता, लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग 

अशा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. जवळपास २४० व्याख्यानांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत. जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व ३८ वयोगटातील खुल्या व ४३ वयोगटातील राखीव प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकणपुत्र, प्रेरणादायी व्याख्याते, प्रमुख मार्गदर्शक: सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...