Monday 12 February 2024

कल्याण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकां-याकडून राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन !

कल्याण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकां-याकडून राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन !

कल्याण, (संजय कांबळे) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ग्रामीण भागात दि १३ फेंब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय जंत नाशक मोहीम राबवली जाणार आहे. यांचा लाभ मुलांनी घ्यावा यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ यांनी केले आहे.

राष्ट्रीय जंत नाशक मोहीम हि १३ फेब्रुवारी संपूर्ण राज्यात आयोजित केली आहे. त्यानुसार कल्याण तालुक्यात एकुण १५३ अंगणवाड्या, १०६ जिल्हा परिषद शाळा, ५९ खाजगी शाळा असून यामध्ये १ ते १९ वयोगटातील ५४ हजार ६५५ लाभार्थी आणि शाळाबाह्य मुले ३०८ असे एकूण ५४ हजार ९६३ इतके लाभार्थी आहेत, या सर्वांना वयोगटानुसार अल्बेंडाझैल गोळी (४००मि ग्रं.) खाऊ घालण्यात येणार आहे. यामध्ये वयोगट १-२ वर्षे अर्धी गोळी पावडर करून अथवा पाण्यात विरघळून पाजावी, २-३ वर्षे एक गोळी पावडर करून अथवा पाण्यात विरघळून, तर वयोगट ३ ते ६ व यावरील ६ ते १९ वर्षे एक गोळी चाऊन खाण्यास द्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

काही अपरिहार्य कारणास्तव जंत नाशक गोळी खाऊ न शकलेल्या मुला-मुलीना २० फेब्रुवारी २०२४ रोजी माँप-अँप दिनी गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. या मोहिमेचे तालुक्यातील सर्व शालेय शिक्षक, मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, तसेच सर्व आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहिमे दरम्यान याच प्रशिक्षित व्यक्तीकडून गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. जंत  नाशक गोळ्या खाऊ घातल्याने मुलांची पोषणस्थिती सुधारुन आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, तसेच शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावेल अशी माहिती डॉ भारत मासाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती कल्याण, यांनी दिली असून सर्व पालकांनी मोहिमेदरम्यान सहकार्य करावे करुन आपल्या मुला मुलींना जंत नाशक गोळी खायला घालून त्यांचे आरोग्य सदृढ करावे असे जाहीर आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...