Monday 12 February 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून कल्याण, शहाड उड्डाणपूल, बिलागेट, धोबीघाट, आणि म्हारळ येथील रस्ते चकाचक, वर्षानुवर्षे धुळ खाणा-या जनतेचे काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून कल्याण, शहाड उड्डाणपूल, बिलागेट, धोबीघाट, आणि म्हारळ येथील रस्ते चकाचक, वर्षानुवर्षे धुळ खाणा-या जनतेचे काय ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध विकास कामे तसेच उल्हासनगर परिसरातील म्हारळ गावाजवळील हाँस्पिटल आदींचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज येत आहेत. त्यामुळे कल्याण, शहाड उड्डाणपूल, बिर्लागेट, धोबीघाट व म्हारळ या परिसरातील कल्याण मुरबाड रस्ता पाणी, फवारणी, झाडून अगदी चकाचक करण्यात आला आहे. हे सर्व एक दिवसासाठी असून गेल्या कित्येक वर्षांपासून याच रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या, धूळ खाणा-या जनतेचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सध्या कल्याण सह डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, इमारतीचे बांधकाम सुरू आहेत, यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे, हवेचे प्रदूषण वाढत आहे. कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान दिड दोन वर्षांपासून काम सुरू आहे. या रस्त्यावरील खड्डे, चिखल, धुळ, यामुळे पाचवामैल येथील नारायण भोईर या शेतकऱ्यांचा जीव गेला, बापसई गावातील वार्डन सत्यजित गायकवाड याला  खड्डे अपघातात हात गमवावा लागला, 

कित्येकाचे गाडी घसरुन अपघात झाले, अनेकांना अपंगत्व आले, तर लहान मुले, वयोवृद्ध, यांना श्वसनाचे आजार झाले,
अजूनही धुळीमुळे म्हारळ, वरप कांबा तसेच या रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सर्दी, खोकला, ताप असे आजार झाले आहेत व होत आहेत, कित्येक वेळा या वाढत्या धुळीबद्दल यापासून होणाऱ्या त्रासाबद्दल अर्ज, विंनती, तक्रारी, मोर्चा, उपोषण, अंदोलन केली मात्र ना कल्याण, डोंबिवली, ना उल्हासनगर पालिका ना रस्ते विकास महामंडळ, ना नँशनल हायवे अथाँरीटी ना जिल्हा परिषद यातील कोणीही नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे लक्ष दिले नाही.

मात्र आज विविध प्रकारच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण व म्हारळ जवळील अंटालिया (उल्हासनगर) येथे येणार आहेत, सांयकाळी हा सोहळा पार पडणार आहे, मात्र सकाळ पासून च कल्याण, शहाड जकात नाका, शहाड उड्डाणपूल, बिर्लागेट, धोबीघाट, म्हारळ सोसायटी येथील कल्याण मुरबाड रस्त्यावर शेकडो सफाई कामगार लावून, धुळ साफ केली जात आहे, रस्ता पाण्याने स्वच्छ केला जात आहे, धुळ हटवली जात आहे. यामुळे काही काळ शहाड उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र याचे कोणालाही सोयरसुतक नव्हते, त्यामुळे गेली दोन अडीच वर्षे या परिसरात व्हिआय पी आले असते तर आम्हांला धुळ खावी लागली नसती असे उपरोधिकपणे एका सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

1 comment:

  1. नवसाचा मुख्यमंत्री ! मग धुळवड तर झालीच पाहिजे ना ! मग ती मातीची असो वा जनतेच्या पैशांची !

    ReplyDelete

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...