Tuesday 20 February 2024

विद्यार्थ्यांनी कोणताच तणाव ना बाळगता आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसावे __

विद्यार्थ्यांनी कोणताच तणाव ना बाळगता आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसावे __

     विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक  जीवनात अतिशय  महत्वाचा टप्पा आणि पुढील आयुष्याला कलाटणी देणाऱ्या परीक्षा म्हजेच बोर्डाच्या परीक्षा होय. फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हटलं की हंगाम चालू होतो तो म्हणजे बोर्डाच्या परीक्षांचा .दरवर्षी दहावी - बारावी या बोर्डाच्या परीक्षाही याच काळात असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने HSC आणि SSC या दोन्हींसाठी महाराष्ट्र बोर्ड २०२४ चे वेळापत्रक जारी केले. वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा ०१ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेतल्या जातील.

    परीक्षेचा कालावधी जसजशा जवळ येतो तसतसा विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चिंतेचे, तणावाचे वातावरण निर्माण होत असत. पण चिंता न करता वर्षभरात झालेल्या अभ्यासाची पुन्हा एकांतात बसून मानलावून उजळणी केली तर बराचसा विषय लक्षात ठेवता येतो. त्या उलट विद्यार्थी ह्यांनी चिंतेच्या छत्रछायेत अभ्यासाला बसले तर केलेला अभ्यास सुद्धा लक्षात राहत नाही. आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सुद्धा हेच होत कि, येणारं उत्तर सुद्धा लिहायला गोंधळून जातो. पालकांनी सुद्धा अशा वेळी आपल्या पाल्यासोबत तणावात न राहता  सकारात्मक विचाराने राहावं. दहावीचा हा महत्वाचा टप्पा असाल तरी तो शेवटचा टप्पा आहे असं कधीच मनात आणू नये. मन आणि सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहू देत. त्याचा चांगला परिणाम नक्कीच जाणवेल. 

***अशा वेळी कमी दिवसात परीक्षेची तयारी कशी करू शकतो?

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करा. परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांची नोट्स करीता धावपळ होते, ही धावपळ टाळण्याकरिता आपण स्वतःच्या नोट्स तयार ठेवल्यास आपला वेळ वाचून आपल्याला अधिक सराव करण्यास मदत होईल. 
२. आपण ठरवलेले अभ्यासाचे  वेळापत्रक पुढे ढकलू नका.
३. उजळणी करताना प्रश्न कधीही वगळू नका. जर तुम्हाला उत्तर माहित नसेल, तर ते एकदा वाचा, ते लक्षात ठेवा, लिहा आणि तुम्हाला ते आठवत नाही तोपर्यंत सराव करा.
४. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित विषय अभ्यासक्रमात, नवीन अभ्यास पुनरावृत्तीसाठी तुमचा वेळ द्या आणि स्वत:ची चाचणी घ्या, निश्चितपणे तुम्ही तुमचे शैक्षणिक उत्तीर्ण होऊ शकता. 
५. फक्त फळे आणि घरीच तयार (कडधान्य, पालेभाज्या) होणारा नाश्ता करण्याचा आणि जेवणाचा प्रयत्न करा. कारण उघड्यावर बनणारे खाद्यपदार्थ तसेच मैदा, बटाटा चिप्स आणि बिस्किटांसारखे स्नॅक्स तुमची मेंदूची शक्ती कमी करतात.
६. हायड्रेटेड राहा (फक्त पाणी प्या, सॉफ्ट / कोल्ड ड्रिंक्स नाही) कारण मेंदू हायड्रेटेड असतानाच सर्वोत्तम कार्य करतो.
७. परीक्षेपूर्वी निरोगी राहण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला सर्दी जरी होत असली तरीही तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही.
८. शक्य असल्यास, विचलित न होता नेहमी एकट्याने अभ्यास करा.
९. रात्री उशिरा अभ्यास करणे टाळा कारण वेळेनुसार मेंदू झोपेची कार्ये आपोआप करू लागतो. त्याऐवजी, सकाळी लवकर उठून (5 ते 6) अभ्यास करा.
१०. महत्त्वाचे मुद्दे चिन्हांकित करताना हायलाइटर वापरा कारण मेंदू साध्या मजकुरापेक्षा चमकदार- रंगीतमध्ये दिसणारे अधिक सहजपणे लक्षात ठेवतो. 
११. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर पहिले सर्व प्रश्न वाचून काढा. त्यांनतर तुम्हाला येणारे आणि सोपे वाटणारे प्रश्न पहिले सोडवा. नंतर कठीण प्रश्नांकडे वळा. सर्वच सोडवत बसलात तर त्यात वेळ निघून जाते आणि कधी कधी सोपे प्रश्न देखील सोडवायचे राहून जातात.  
१२. अगदी आवश्यक नसल्यास टीव्ही, चित्रपट, चॅटिंग, खूप वेळेचे फोन कॉल्स, सोशल मीडिया टाळा. हे तुम्हाला अभ्यासापासून  तुम्हाला दूर नेतील. संगीत वाजवा, किंवा गाणे, किंवा नृत्य करा पण हे फक्त अभ्यासाच्या छोट्या विश्रांती दरम्यान फक्त ध्यान करा. हे तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मदत करेल. 
१३. आठवड्यात तुम्ही जे काही अभ्यासले आहे ते जाणून घ्या आणि तुम्हाला तपासू शकणाऱ्या एखाद्याला विचारा !!

      विद्यार्थ्यांनी  कोणताच तणाव ना बाळगता केलेला अभ्यास लक्षपूर्वक करून रणनिती तयार करून स्वतःवर विश्वास ठेवा. त्याच आत्मविश्वासाने बिनधास्त परीक्षेला बसा. प्रसन्न मनाने प्रश्नपत्रिका सोडवा. यश नक्की मिळेल आणि तुम्ही परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होवोत यासाठी माझ्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी मित्रांना या होणाऱ्या बोर्डाच्या  परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! 

श्री. निलेश महादेव कोकमकर (मुंबई)  
पत्रकार, समाजसेवक (+91 99207 38483)

No comments:

Post a Comment

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...