Friday 16 February 2024

बारामतीत लोकसभा निवडणूकीत नणंद भावजय यांच्यात तगडी लढत, सुनेत्रा पवार यांचा चित्र रथ रस्त्यांवर !!

बारामतीत लोकसभा निवडणूकीत नणंद भावजय यांच्यात तगडी लढत, सुनेत्रा पवार यांचा चित्र रथ रस्त्यांवर !!

भिवंडी, दिं,१५, अरुण पाटील (कोपर) :

       राष्ट्रवादीच्या फुटी नंतर पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांचा खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्या मुळे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा चित्र रथ शहरात रस्त्यांवर फिरत आहे. सद्या आता बारामतीत नणंद- भाजवयांची लढतीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रचंड चर्चा होती. 
        अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. मात्र बारामती लोकसभेसाठी अजित पवार उमेदवार कोण देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामतीतील उमेदवारावर लोकसभेची गणितं अवलंबून आहे. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी करावी, असं भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे. त्यासोबतच बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचीदेखील हिच ईच्छा व्यक्त केली होती. आता त्याच दिशेने अजित पवार पावलं टाकताना दिसत आहे. 
         काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली होती.
         सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही. त्यांनी पर्यावरणाशी आणि महिलांशी संबंधित कामात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. शिवाय वेग वेगळ्या माध्यमातून त्या सामजिक कामंदेखील करतात. मात्र निवडणुकीच्या रिंगणात त्या पहिल्यांदाच उतरणार असल्याचे संकेट अजित पवारांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. 
          सौ.सुनेत्रा अजित पवार आता नणंद असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसे चीत्र रथ तयार करण्यात आले आहेत. बारामती शहरात हे चित्र रथ फिरताना दिसत आहे. यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा आढावा आहे. या वरुन आता सौ.सुप्रिया सुळे आणि सौ. सुनेत्रा पवारांमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत तगडी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोबतच सुप्रिया सुळेंनी देखील बारामती दौरे वाढवले आहेत. त्यामुळे बारामतीत सौ. सुनेत्रा पवार विरुद्ध सौ. सुप्रिया सुळे हे चित्र पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...