Friday 16 February 2024

➕ ➕ रेडक्रॉस मार्फत यावल तालुक्यातील डोंगरकराठा येथील आपतग्रस्तांना मदत !!

➕ ➕ रेडक्रॉस मार्फत यावल तालुक्यातील डोंगरकराठा येथील आपतग्रस्तांना मदत !!


जळगाव, प्रतिनिधी - यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे  शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गावातील शेतकरी  श्री.अनिल धनराज सरोदे आणि श्री. दगडु गेंदू पाटील  यांच्या घरातील घरगुती, शेतीचे सर्व साहित्य आणि कागदपत्रे इत्यादी पूर्णतः जळून खाक झाले.

सदर माहिती माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांना प्राप्त होताच त्यांनी रेडक्रॉसला संपर्क साधत दोन्ही परिवारांना मदत करण्याबाबत सूचना केल्या.  मा. जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार तसेच उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेअरमन श्री. विनोद बियाणी व आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष सांखला यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा व टीमने  प्रतिनिधींनी  घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी करीत दोन्ही परिवारांना भांड्याचा सेट, चटई, बादल्या, कपडे, स्वेटर, ताडपत्री, इत्यादी संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांना मदत केली. याप्रसंगी  यावल तालुक्याच्या तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी शासनामार्फत त्वरित नवीन रेशनकार्ड बनवून दिले आणि भविष्यातही मदत करण्याबाबत आश्वासन दिले.


Indian Redcross Society,
Jalgaon.
Ph: 0257- 2226233, 2236255, 22355855.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...