Thursday 15 February 2024

श्री योग वेदांत समिती कल्याण तर्फे मातृ पिता पूजन दिवस साजरा, मुलांकडून पूजनाने आईवडील भावूक !

श्री योग वेदांत समिती कल्याण तर्फे मातृ पिता पूजन दिवस साजरा, मुलांकडून पूजनाने आईवडील भावूक !

कल्याण, (संजय कांबळे) : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत तरुणाई १४ फेब्रुवारी हा दिवस व्हँलेटाईन डे दिवस साजरा करण्यात दंग असतानाच अस्सल भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी संत आसाराम बापू यांच्या पासून प्रेरणा घेऊन श्री योग वेदांत समिती कल्याण यांनी हा दिवस आई वडील पूजन दिवस म्हणून साजरा केला. यावेळी हजारो मुलांनी आप आपल्या आईवडिलांचे पूजन केले. यावेळी पालक भावूक झाले होते.

कल्याण मधील यशवंतराव चव्हाण मैदानात (मँक्सी ग्रांऊड) संतोषी माता रोड येथे श्री वेदांत समिती कल्याण यांनी पूज्य संत आसाराम बापू यांची प्रेरणा घेऊन मातृ पिता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, विशेष म्हणजे, सध्याची तरुण पिढी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हँलेनटाईन डे साजरा करतात पण याला बगल देत याच दिवशी आई वडील पूजन करण्याचे ठरविण्यात आले, यानुसार हजोरोंच्या संख्येने भाविक यामध्ये सहभागी झाले. शेकडो आईवडिलांना आसनावर बसवून संत आसाराम बापू यांचा आशीर्वाद लाभलेल्या रेखा दिदी यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते  मुलांनी आई वडिलांची पूजा केली. यावेळी ते भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी प्रेममय व मंगलमय भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

भारतातील तरुण पिढी सुसंस्कृत व चारित्र्य संपन्न व्हावी यासाठी समितीतर्फे नेहमी प्रयत्न करत असते. संत आसाराम बापू यांच्या प्रेरणेतून सुरु झालेले हे काम देश विदेशात पोहोचले आहे, छत्तीसगड च्या मुख्यमंत्र्यांनी तर १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ पितृ दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. आसाराम बापू यांनी व्हँलेनटाईन डे ला पर्याय म्हणून २००७ मध्ये पालक पूजन सुरू केले, त्याचेच हे व्यापक रुप असल्याचे परहित चँरेटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी सांगितले.

या सुंदर व भावपूर्ण कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य श्री योग वेदांत समितीचे संचालक सत्येंद्रभाई, परहितचे अध्यक्ष विशाल गुफ्ता, गणपती प्रसाद कडियाल, राजेश बावस्कर, मदनसिंह खत्री, कैलास पाल भगवान लाड, चंद्रकांत पाटील, कमलेश पंजाबी, राम अवध यादव, हरिओम पांडे, हरिश यादव, पंकज भाई, दमानी, हरहा यादव, यांच्या सह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...