Thursday 15 February 2024

अजिंक्य युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे "इंडियन आयकॉन अवॉर्ड- २०२४" साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !!

अजिंक्य युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे "इंडियन आयकॉन अवॉर्ड- २०२४" साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         मुंबई सह उपनगरमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजिंक्य युवा प्रतिष्ठान मुंबईतर्फे "इंडियन आयकॉन अवॉर्ड- २०२४" साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. उद्योग, शिक्षण ,क्रीडा, कला, पर्यावरण, आरोग्य विभाग, राजकारण, सामाजिक संस्था, जेष्ठ पत्रकार, श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, इलेक्ट्रॉनिक मिडिया आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, विविध संघटना किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटना आपले नामांकन उपरोक्त पुरस्कारसाठी पाठवू शकतात. प्रस्ताव/नामांकन दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ ते २२ मार्च २०२४ पर्यंत पाठवावीत. त्यानंतर येणारा प्रस्ताव/नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.पुरस्कार वितरण सोहळा, नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह / सन्मानपत्र/ शाल /भारतीय संविधान प्रत/ पुष्पगुच्छ असे असेल. पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने आपली निवड निश्चित केल्यानंतर आपणाला निवड पत्रासह याबाबतची  माहिती देण्यात येईल. 

प्रस्ताव पाठवण्यासाठी व्हाट्सऍप  क्रमांक - 9768637534 यांच्याशी संपर्क करावा. तसेच ई-मेल आयडीवर प्रस्ताव पाठवायचा असेल तर त्यांनी आपला प्रस्ताव ajinkyayuvaprathishthan@gmail.com वर पाठवावा.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...