Wednesday 14 February 2024

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ?


मुंबई, गणेश नवगरे : राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. या शिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती आहे.

शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असं मंगलदास बांदल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...