Wednesday 14 February 2024

मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंदला, कल्याण डोंबिवली परिसरात प्रतिसाद नाही ?

मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंदला, कल्याण डोंबिवली परिसरात प्रतिसाद नाही ?

कल्याण, (संजय कांबळे) : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जंरागे पाटील हे आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती, मात्र या बंदला कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण तसेच टिटवाळा परिसरात अजिबात प्रतिसाद मिळाला नाही, आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत चालू होते.

मराठा समाजाचे नेते मनोज जंरागे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा ताकदीने उभा केला आहे, त्यांच्या लढ्याला यश देखील मिळाले आहे, त्यांच्या मुंबई कडे येण्यासाठी निघालेल्या मोर्चा वाशी नवी मुंबई येथेच थांबविण्यात आला, यावेळी सगेसोयरे बाबतीत अध्यादेश घेऊन येण्याचा इशारा त्यांनी दिला होता, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हा अध्यादेश घेऊन वाशी येथे आले व जरांगे पाटील यांना तो दिला, मात्र यानंतर सत्तेतील मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या वर सडकून टीका केली, कि मुसूदा व अध्यादेश यातील फरक कळतो का? यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ माजली, मराठा समाजात विविध प्रकारचे विचार प्रवाह निर्माण झाले, आपली शासनाने फसगत केली असे काहींना वाटू लागले, त्यामुळे कित्येक वर्षांनंतर एकत्र आलेल्या समाजाला अडचण येवू नये, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, म्हणून वाशीतून मोर्चा मागे आल्यानंतर देखील जंरागे पाटील यांनी सगेसोयरे या अध्यादेश बाबतीत आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले,आज त्यांच्या उपोषणाचा ५ दिवस आहे, परंतु शासन म्हणावे तसा प्रतिसाद देत नाही, प्रकृती खालावल्याशिवाय शिष्टमंडळ भेटायला येत नाही असे आरोप करत जंरागे पाटील उपोषणावर ठाम राहिले, त्यांनी अन्न, पाणी आणि औषध उपचार घेण्यास नकार दिला, त्यामुळे मराठा समाजामध्ये कमालीचा संताप निर्माण होऊ लागला आहे, यातूनच समाजाने आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली, मात्र कल्याण डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण भागात आजच्या बंदला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही, आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत चालू होते, कल्याण मुरबाड नगर मार्गावर वाहतूक सुरू होती, तसेच सर्व दुकाने, बाजारपेठेत लोकांची गर्दी दिसून येतं होती, याबाबत कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना विचारले असता, तालुक्यात कुठेही बंद नाही, सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...