Tuesday 13 February 2024

धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

*जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण चांडक यांना  पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार ; आरोग्यदूत मंगेश चिवटे,पत्रकार विवेक भावसार यांचाही समावेश*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              सा. धगधगती मुंबई हे शासन यादीवरील वृत्तपत्र १४ वर्ष पूर्ण करून २० फेब्रुवारी २०२४ रोजी १५ व्या वर्षात पर्दापण करत आहे. त्यानिमित्ताने वर्धापन दिनासह विविध मान्यवरांना त्यांच्या कामाची दखल घेऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे वृत्तपत्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाबरोबर इतर कार्यक्रम राबविले जातात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी पाडा, दिव्यांग बांधवांना मदत, ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैधकिय सहाय्यता निधीसाठी मदत करणे. त्याचबरोबर धगधगती मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, आजपर्यंत ७५ लोकांना सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी सुद्धा राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई महानगरपालिका  मुख्य कार्यालय समोर, आझाद मैदान शेजारी, मुंबई - ०१ येथे शनिवार दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजता समारंभ पूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे. २०२४ चे पुरस्कार पुढीलप्रमाणे १) पत्रकारिता जीवन गौरव - श्री. श्रीकृष्ण चांडक  सर, संपादक दै. महासागर, २) सहकार रत्न - हरिश्चंद्र बाबलिंग जंगम, ३) शिक्षण रत्न - जगदीश मरागजे सर, ४) युवा राजकीय नेता - ॲड. संग्राम शेवाळे, ५) वारकरी भूषण - ह.भ.प. प्रवीण शेलार महाराज, ६) समाज भूषण -  एम.ए. सुसाई (फादर), ७) समाज रत्न - दीपक लोखंडे समाजसेवक, ८) उद्योग रत्न - कौतिक दांडगे - महाराष्ट्र बाजार पेठ अध्यक्ष, ९) पत्रकारिता गौरव - विवेक भावसार- राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार (मंत्रालय), १०) कलारत्न  - दिगंबर नाईक, ११) कलारत्न -  सिने अभिनेते किरण माने, १२) आरोग्यदूत - वैद्यकिय रत्न - मंगेश चिवटे, कक्षप्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी विभाग , १३) युवा उद्योजक - श्रेयस मोहन नायकवडी, १४) साहित्य रत्न  - इसहाक बिराजदार, १५) कायदा रत्न (भूषण) - ॲड रिना संदीप कोरडे, १६) संगीत रत्न (कोयना भूषण) राजाराम बुवा शेलार, (भजन सम्राट) नवी मुंबई, १७) शिवाजीराव माटेकर - सहकार क्षेत्र व्यवस्थापन रत्न, १८) गोरखनाथ पोळ सर - मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्था नवी मुंबई 

तर कर्तृत्ववान महिला सन्मान -१) ममता सकपाळ (सिंधुताई सकपाळ यांच्या कन्या) अध्यक्षा- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था, पुणे, २) सौ. कविता पांचाळ - महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट कापसेवाडी, जावळी, सातारा, ३) डॉ. प्राची ढोले - पत्रकारीता  महिला गौरव पुरस्कार (मुंबई), ४) सौ. विनया महेश निंबाळकर (स्नेहग्राम सामाजिक व शैक्षणिक संस्था) व अजित फाऊंडेशन,बार्शी-सोलापूर, ५) ॲड. स्मिता चिपळूणकर - कायदेविषयक सल्लागार यांना जाहीर झाला आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...