Tuesday 13 February 2024

दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील प्रगती विद्या मंदिर शाळेतील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी !!

दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील प्रगती विद्या मंदिर शाळेतील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी !!

*रत्नागिरी खो-खो टीममध्ये चार मुली आणि दोन मुलांची निवड*

कोकण, (शांताराम गुडेकर/दिपक मांडवकर) :
           दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील प्रगती विद्या मंदिर शाळेतील मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव सुवर्ण अक्षरराने कोरले आहे. प्रगती विद्या मंदिर, शिवाजीनगर या शाळेतील कु. सृष्टी जयेश मेंगे, कु. निक्षीता निलेश मेंगे, कु. सुहानी मधुकर गावडे, कु. आयुषी चंद्रकांत चव्हाण, कु. जिगर जयंवत वाळंज, कु. ऋग्वेद सचिन आईनकर यांची रत्नागिरी खो-खो टीम मध्ये निवड करण्यात आली आहे.रत्नागिरी खो -खो टीममध्ये या मुलांची निवड झाल्याबद्दल शाळेचे शिक्षक श्री.सपकाळ सर व अन्य प्रशिक्षण टीम व संपूर्ण शिक्षक वर्ग, गावातील पदाधिकारी यांनी या मुलांचे भरपूर कौतुक केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !! मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :        ...