Tuesday 13 February 2024

ग्रूप ग्रामपंचायत गोवेली रेवती तर्फे भव्य मोहत महाआरोग्य शिबीर, अनेकांनी घेतला लाभ !

ग्रूप ग्रामपंचायत गोवेली रेवती तर्फे भव्य मोहत महाआरोग्य शिबीर, अनेकांनी घेतला लाभ !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोवेली रेवती तर्फे परिसरातील नागरिकांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

कल्याण ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मधुमेह, बायपास सर्जरी, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, एँन्जोप्लास्टी, हदय रोग तपासणी, ईसीजी, एँन्जोग्राफी, जनरल ओपीडी, आणि बीपी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या, यासाठी ग्रुप ग्रामपंचायत गोवेली, रेवती तसेच जवळपास च्या सर्व गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, यावेळी सरपंच सौ पूजा दिपक जाधव, उपसरपंच काळूराम घुडे सदस्य काशिनाथ चोरगे, सौ कल्पना पोंडेकर, रुपेश बासरे समाज सेवक, दिपक जाधव, ग्रामसेवक जयवंत मोरे, पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व प्लॅटिनम हॉस्पिटलचे  डॉक्टर अपूर्वा पोटे, प्रतीक्षा चोधरी, मानशी शिंदे, मॅनेजर, हेमंत दाखले, रवींद्र निकम, समीर घाट इत्यादी नी शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या शिबीराबद्ल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !!

बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन !! मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर) :        ...