Tuesday 13 February 2024

नवनाथ प्रतिष्ठान पालवणी (मुंबईकर) मंडळाचा सांस्कृतिक विद्यार्थी गुणगौरव व महिला हळदीकुंकू संपन्न !!

नवनाथ प्रतिष्ठान पालवणी (मुंबईकर) मंडळाचा सांस्कृतिक विद्यार्थी गुणगौरव व महिला हळदीकुंकू संपन्न !!

मुंबई, (गणेश नवगरे) : नवनाथ प्रतिष्ठान पालवणी (मुंबईकर) च्या वतीने सानपाडा येथे महिला हळदीकुंकू व सांस्कृतिक विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला व नवनाथांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स मोठ्या दिमाखात साजरे केले. यानंतर हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला व विद्यार्थ्यांना गुणगौरव तसेच प्रोत्साहन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‌

यावेळी मान्यवर नवनाथ प्रतिष्ठान पालवणी अध्यक्ष अनिल मुरकर, नाथपंथी गोसावी समाज कोकण विभाग, गणेश गोसावी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र बामणे, महिला अध्यक्षा सुजाता मुरकर, व प्रमुख पाहुणे म्हणून सानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब तसेच शिवसेना (उ.ब.ठा.) गटाचे मा. नगरसेवक सोमनाथ वास्कर तर समाजाचे माजी अध्यक्ष अनंत नवगरे, बाळू जोगी हे ही उपस्थित होते. 

प्रमुख पाहुण्यांनी व समाज बांधवांनी मंडळाचे कौतुक केले. यावेळी आमचे प्रतिनिधी व पत्रकार गणेश नवगरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब व शिवसेना (उ.ब.ठा.) गटाचे मा. नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्याशी बातचीत केली.

No comments:

Post a Comment

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...