Monday 19 February 2024

नालासोपारा शहरात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी....

नालासोपारा शहरात  विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी....

नालासोपारा, प्रतिनिधी ता १९ :- जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने नालासोपारा शहरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबीर, हळदी कूंकूचे  आयोजन करण्यात आले होते.

नालासोपारा पश्चिम येथिल समेळगाव येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धेत महिलांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक नम्रता गोडांबे, व्दितीय क्रमांक दिव्या विरकर, तृतीय क्रमांक श्रावणी अंबोकर यांनी पटकाविले विजेत्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शिवसेना महिला आघाडी शहर संघटक वंशिका नर व शहरप्रमुख राजेंद्र रांजणे यांच्या वतिने व जिजाऊ संस्थेकडुन आचोळे गाव येथे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप करण्यात आली शिबीरास नागरीकांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला.
आचोळे गाव येथे महिलांसाठी हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते वंशिका नर यांच्या वतिने महिलांना वान देऊन भेटवस्तु देण्यात आली.

यावेळी शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक नविनजी दूबे शहरप्रमुख राजेंद्र रांजणे, महिला आघाडी शहरसंघटक वंशिका नर, रूचिता नाईक व सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...