Monday 19 February 2024

दुःखात सुख व समाधान शोधता आले पाहिजे, परिस्थीतीवर मात करून जगता आले पाहिजे - भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे

दुःखात सुख व समाधान शोधता आले पाहिजे, परिस्थीतीवर मात करून जगता आले पाहिजे - भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे

मुंबई, प्रतिनिधी :
          सामाजिक बांधिलकी या एकमात्र विचाराने जगणारे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानां 6 फेब्रूवारी 2024 रोजी ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला पऱतु गरीब गरजू लोकांचे आशिर्वाद व डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नाने त्यांची प्रकृति स्थिर झाली, परंतु आजाराचे गांभिर्य ओळखुन डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार  मुंबई येधील जे जे रूग्णालमात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या़ंच्या प्रकृतित सुधारणा होत आहे.

            भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नवि मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण आज दि 17 फेब्रूवारी 2024 रोजी सुंदर डांगे यांची विचारपूस करण्यासाठी आले होते तेव्हा सुंदर डांगे यांचे लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या, शेजारील रूग्णांना याची माहिती मीळाली असता सर्वानी सहभाग घेऊन उत्साहाने सुंदर डांगे यांचे लग्नाचा वाढदिवस साजरा केला. याप्रंसंगी शुभेच्छा स्विकारून आभार व्यक्त करताना सुंदर डांगे यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन, दुःखात सुख समाधान शोधुन परिस्थितीवर मात करून जगता आले पाहिजे, संकट येतील जातील परंतु समर्थपणे मुकाबला केला तर विजय निश्चित आहे. 
      याप्रसंगी वॉर्ड क्र 22 मधील रूग्ण, स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...