Monday, 19 February 2024

शिक्षण मंडळाच्या गलथन कारभाराचा टिटवाळ्यातील अठरा विद्यार्थ्यांना फटका !!

शिक्षण मंडळाच्या गलथन कारभाराचा टिटवाळ्यातील अठरा विद्यार्थ्यांना फटका !!

*विलंब शुल्क भरूनही पुन्हा अतिविलंब शुल्क भरण्याची मागणी*

कल्याण, संदीप शेंडगे : दहावीची परीक्षा तोंडावर आली असून एक मार्च रोजी परीक्षा सुरू होणार असल्याचे शिक्षण मंडळांनी जाहीर केले असले, तरी शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका टिटव्याळयातील केबीके इंटरनॅशनल स्कूलच्या १८ विद्यार्थ्यांना बसला आहे. केबीके इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील अठरा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून त्यांचे फॉर्म शिक्षण मंडळाने अद्याप भरले नसून शाळेकडून अतिविलंब शुल्काची मागणी करण्यात येत आहे.

इयत्ता दहावीच्या मुलांचे एनरोलमेंट फॉर्म ऑनलाईन भरण्याचे आदेश सर्वच शाळांना शिक्षण मंडळांना  दिले होते, त्यानुसार केबीके इंटरनॅशनल स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांचे फॉर्म अनेकदा ऑनलाइन भरण्याचे प्रयत्न केले होते परंतु कधी सर्वर डाऊन तर कधी साईट बंद असल्याने अनेकदा फॉर्म भरण्यात शाळेला अडचणी आल्या होत्या. याबाबत शाळेने शिक्षण मंडळाकडे सर्वर डाऊन तसेच साईट बंद असल्याची तोंडी तक्रार केली होती. शिक्षण मंडळातील कर्मचारी अभय पाटील व दिपाली उपाडे यांच्याकडे वारंवार फोन करूनहीं साईट बंद असल्याने त्यांनी ऑफलाइन फॉर्म शिक्षण मंडळाकडे भरण्यास सांगितले शाळेने दिनांक २६/१२/२०२३ रोजी रीतसर फॉर्म भरण्यात आले. त्यावेळीही शिक्षण मंडळाने शाळेकडे अति विलंब शुल्क भरण्यास सांगितले. त्यावेळी विलंब शुल्क भरून शाळेने फॉर्म भरून तसे लेखी पोहच घेतली होती.

तरीही मुलांचे ऑनलाईन फॉर्म रजिस्टर न झाल्याने शाळेने पुन्हा शिक्षण मंडळाकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांचे फॉर्म अतिविलंब शुल्क भरल्याशिवाय आम्ही साइटवर अपलोड करणार नाही असे सांगितले गेले. एकदा विलंब शुल्क भरूनही शिक्षण मंडळाच्या हलगर्जीपणामुळे शाळेला पुन्हा अतिविलंब शुल्क भरावे लागत आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून शिक्षण मंडळाच्या गलतन कारभाराचा १८ विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर फटका बसला असून मुलांमध्ये व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत के बी के इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष सुबाराव खराडे यांना विचारले असता शिक्षण मंडळाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व मुलांचे विलंब शुल्क भरून रितसर फॉर्म भरून त्याची लेखी पावती घेतली आहे. तरी शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांकडून अति विलंब शुल्काच्या नावाने पैशाची मागणी करीत आहेत हा विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अन्याय असून शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे अति विलंब शुल्क माफ करून  फॉर्म भरून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही हे असे सांगितले आहे.
याबाबत शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय नवी मुंबई वाशी  काय निर्णय घेते याकडे पालकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...