चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!
भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्याचे काम मेसर्स, सुप्रिम इंफ्रास्ट्रक्चर या कंपनी मार्फत बी.ओ.टी. तत्वावर करण्यात आले आहे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस योग्य नसल्यामुळे नागरीक, विदयार्थी तसेच, आजारी वयोवृद्ध्द व्यक्ती यांना अतिशय त्रास होता आहे. तसेच वाहनांचे अपघात होवुन लोक मृत्युमुखी पडले असून, जिव घेणे अपघात ही झाले आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात येथील एक सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती हे सन २०१७ सालापासून सतत आंदोलने करत आहेत पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांची दिशाभूल करणारी उत्तरे देत असून, या रस्त्यावर साधारणपणे ३ वर्षीत १३ कोटी २७ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च केलेला असून, रस्त्याची दुरावस्था मात्र कायम आहे. केलेला खर्च हा बोगसकामे केल्याचे दाखवुन लाखो रुपयांची शासनाची फसवणुक लुट केलेली आहे. सदर रस्त्यावर सुप्रिम कंपनी मार्फत टोल वसुली असताना सा.बा. विभागा मार्फत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यातील कामात झालेला हलगर्जीपणा व संगनमताने झालेल्या भ्रष्ट कामासंदर्भात दोन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती यांनी भिवंडी उपविभागीय कार्यालय येथे उपोषण केले होते पण निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न करता आजही रस्त्याची तीच परिस्थिती आहे व नागरिकांचा त्रास तसाच आहे.
तसेच या भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील एक वादग्रस्त अधिकारी श्री. गिते उपअभियंता म्हणून उपविभागात कार्यरत झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची त्यांनी काढलेल्या बिलांची अंदाज पत्रके, एम.बी., विले, टेस्ट रिपोर्ट, डाबर, रॉयल्टी चलनाच्या पावत्या केलेली कामे आस्तित्वात आहेत काय? सदरची कामे झाली होती काय? या मुद्दयांच्या आधारे उच्च स्तरीय (स्वतंत्र चौकशी अधिकारी) नेमून पण यातून (अधिक्षक अभियंता, दक्षता व गुण नियत्रण मंडळ) यांना वगळून चौकशी करण्यात यावी पण लगेच तात्काळ खड्डे भरावेत तसेच, सदरचे खड्डे भरताना मागिल खड्डे भरण्याचे टेंडर दिलेल्या ठेकेदारा कढुन त्वरीत भरुन रस्ता पुर्ववत करावा अन्यथा आम्हाला या रस्त्यावर नागरिक, प्रवाशी, लोकप्रतिनिधी, विदयार्थी विविध संघटना सोबत घेवुन आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment