भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जी. के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थीवर्ग, शिक्षक यांचे चैत्यभूमीला अभिवादन !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथील शिक्षिका प्रा.सौ.रसिका लोकरे मॅडम व प्रा.श्वेता जाधव मॅडम यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींसह दादर येथील चैत्यभूमीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जाऊन महाविद्यालयाच्या वतीने आदरांजली वाहिली.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा महत्वाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.रितिका मोरे, कु.प्रणिता गायकवाड, कु. सपना बहादुर, कु.सुश्मिता काटे, कु.श्वेता शिंदे, कु. एकता भस्मे इ. विद्यार्थिनींनी सहभाग दर्शवला. तसेच चैत्यभूमी हे स्थळ केवळ स्मारक नाही तर समता, न्याय आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. हल्लीच्या तरुण पिढीमध्ये सहनशीलता कमी झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. या ठिकाणी आल्यावर कधीही हार न मानता आपण सतत प्रयत्न केला पाहिजे अशी प्रेरणा येथे मिळते. तसेच तेथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल वर विद्यार्थिनींनी अनेक पुस्तके विकत घेतली.
No comments:
Post a Comment