Sunday, 7 December 2025

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २५/२०२५ चा समारोप उत्साहात संपन्न !!!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २५/२०२५ चा समारोप उत्साहात संपन्न !!!

मिरा रोड (ठाणे), दि. ६ : नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार व  दि. ०१ ते ०५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दुपारी १४.०० ते सायं. १८.३० या वेळेत मेगा पार्टी हॉल, दुसरा मजला, जुना पेट्रोल पंप, मिरा रोड(पूर्व), जि. ठाणे येथे आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक २५/२०२५ आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी एकूण २३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

पाठ्यक्रमाच्या पाच दिवसांत संघटनेचे महत्व, कार्यप्रणाली, सशक्तीकरण, बळकटीकरण तसेच प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आजच्या समारोपीय दिवशी श्री. अनिल गावित (सउनि), श्री. नथवाणी (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-१, ठाणे व मानसेवी निदेशक) तसेच श्री. हनुमान चौधरी (मानसेवी निदेशक व विभागीय क्षेत्ररक्षक) यांनी महत्त्वपूर्ण व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमादरम्यान श्री. मुरुगन पाल, वरिष्ठ नागरी संरक्षण स्वयंसेवक यांनी प्रात्यक्षिकांना सहकार्य केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

समारोप प्रसंगी मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांनी विनियम-५ नुसार यशस्वी प्रशिक्षणार्थींना संघटनेत सभासदत्वाची शपथ देत बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेचा प्रसार वाढवून सामान्य नागरिकांमधून अधिकाधिक स्वयंसेवक निर्माण करण्याचे आवाहन केले.

या पाच दिवसीय प्रशिक्षणात सउनि श्री. आननसिंग गढरी, श्रीमती दि. दौ. घरत, डॉ. राहुल घाटवळ (मास्टर ट्रेनर, विभागीय क्षेत्ररक्षक), श्रीमती शकुंतला राय (विभागीय क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक) यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली.

समारोप कार्यक्रमास उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-३ (उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूर) व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव, तसेच डॉ. हनी मित्तल, अब्राहम पाल आणि अनेक नागरी संरक्षण स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...