Sunday, 7 December 2025

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

ठाणे : दि. ७ डिसेंबर – नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक २६/२०२५ याचा समारोप आज सन्मानपूर्वक करण्यात आला. मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेश व मान्यतेनुसार दिनांक ०२ ते ०६ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० ते दु. १४.०० या वेळेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालय, ठाणे येथे हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकूण ३७ प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.

प्रशिक्षणादरम्यान श्री. अनिल गावित (सउनि), श्री. नथवाणी (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–१), श्री. कमलेश श्रीवास्तव (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–३), डॉ. प्रकाश ठमके (मास्टर ट्रेनर व मानसेवी निदेशक) तसेच श्री. रोहितसिंग राठोड (वि.क्षे. नागरी संरक्षण) यांनी विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्ये कसे  आत्मसात करावे याबाबत विस्तृत माहीती दिली. अंतिम दिवशी प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

पाठ्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मा.उपनियंञक, नागरी संरक्षण यांनी वर्गावर अचानक भेट देऊन संघटनेचे महत्त्व, कामकाज पद्धती, सक्षमीकरण व संघटन बळकटीकरण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. तर अंतिम दिवशी समारोपीय कार्यक्रमात मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांनी विनियम–५ नुसार प्रशिक्षणार्थींना सभासदत्वाची शपथ देत संघटनेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी नागरी संरक्षणच्या कार्याचा प्रचार व प्रसार करून अधिकाधिक स्वयंसेवक घडविण्याचे आवाहनही केले.

प्रशिक्षणादरम्यान डॉ. राहुल घाटवळ (मास्टर ट्रेनर व वि.क्षे.) व श्री. रामबरण यादव (वि.क्षे. व मानसेवी निदेशक) यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली.

समारोप समारंभास उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र–३) व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव, महाविद्यालयाच्या समन्वयक सौ. स्वाती देवकर, श्रुती मॅडम तसेच NSS विद्यार्थी उपस्थित होते.

दि. ६ ते १३ डिसेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या संयुक्त ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त मा. महासंचालक, नागरी संरक्षण, होमगार्ड्स व अग्निशमन,नवी दिल्ली तसेच सचिव आणि गृहमंत्री, भारत सरकार यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण आणि स्वयंसेवेचा जागर, जागरूकता वाढविणारा हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...