Sunday, 7 December 2025

गार्डियन हायस्कूलमध्ये 'वार्षिक संमेलनाचा सोहळा 'मोठ्या उत्साहात साजरा !

गार्डियन हायस्कूलमध्ये 'वार्षिक संमेलनाचा सोहळा 'मोठ्या उत्साहात साजरा !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
विद्यार्थ्यांमधील अंगभूत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,या उ‌द्देशाने दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी गार्डियन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, भोपर, डोंबिवली या शाळेच्या वतीने 'वार्षिक संमेलन' सोहळा शालेय प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक संमेलनाचा विषय होता लाईटस कॅमेरा एज्युकेशन. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉ.उषावती शेट्टी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्वागतगिताने करण्यात आली.
              या सोहळ्यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नृत्यामार्फत नैतिक मूल्ये, कठोर परिश्रम, शिक्षणाविषयी ओढ, हरवलेले बालपण, मस्ती, सकारात्मकता, आशा आकांक्षा आत्मविश्वास यांची सांगड घालत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थी वि‌द्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने, मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या नृत्यांचे सादरीकरण केले.
              कार्यक्रमाला गार्डियन शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी अॅडव्होकेट सुसाना वर्गीस, तसेच गार्डियन शैक्षणिक संस्थेच्या संचालिका सन्माननीय सौ. शालिया थॉमस, सन्माननीय सौ. अॅनी वर्गीस, गार्डियन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. डॉ. शोभना नायर, विशेष निमंत्रित म्हणून सौ. मिनी अब्राहीम, कुमार अॅजिकल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...