संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!
मुंबई प्रतिनिधी : ता.६ — दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, जोगळेकरवाडी, सायन (पूर्व), मुंबई येथे संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल सायन (पु.) यांच्या संयुक्त शाळेय समितीची सभा संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर व शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
सभेचे अध्यक्षस्थान माननीय बी. डी. काळे सर यांनी स्वीकारले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव सर तसेच बी.एन.एन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत माळुंजकर सर उपस्थित होते. प्रतिमापूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक श्री. भीमराव परदेशी सर व श्री. विश्वनाथ राऊत सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर राऊत सरांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून सदर इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर नवीन ठराव सभेपुढे मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले व त्यांच्या अंमलबजावणीसंबंधी अध्यक्षांकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
मासूम संस्थेकडून सातत्याने दोन्ही रात्र शाळांना मदत करणारे प्रोजेक्ट मॅनेजर श्री योगेश यादव सर, यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती अनुराधा बिंगी मॅडम यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थी जितेंद्र कांबळे गुरुजी हे रात्रशाळेसाठी सातत्याने योगदान देत असल्याबद्दल त्यांचेही पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी माननीय बी. डी. काळे सरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या विशाल संस्थेत आज ३५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व १००० हून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. अशा मोठ्या संस्थेच्या रात्र शाळांमध्ये शिकणे ही तुमच्या भाग्याची बाब आहे. आमच्या दोन्ही रात्रशाळा मासूम संस्थेच्या रोल मॉडेलमध्ये पहिल्या दहा क्रमांकात आहेत. तसेच शाळांचा एसएससी निकाल उच्च प्रतीचा लागत असून यापुढे विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाबरोबरच गुणवत्तेतही प्रगती करावी.”
या आश्वासक शब्दांना प्रतिसाद देत दोन्ही शाळांचे मुख्याध्यापकांनी उच्च गुणवत्तेसह शंभर टक्के निकालासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या मान्यवरांकडून दोन्ही शाळांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या सभेस शारदा नाईट हायस्कूलचे प्राचार्य श्री सोनवणे सर, श्री बागुल सर व शिक्षकवर्ग, ज्ञानविकास नाईट हायस्कूलचे श्री पुंडलिक सूर्यवंशी सर, मासूम संस्थेचे शिक्षक तसेच संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचे श्री समाधान खैरनार सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रमोद गीते उपस्थित होते. तसेच मासूम संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर निकिता पोल मॅडम याही उपस्थित होत्या या सर्वांचे सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सभेचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला. शेवटी सर्वांचे आभार श्री सोनवणे सरांनी मानले.
— संयुक्त शाळेय समिती,
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.)
व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.)
No comments:
Post a Comment