Friday 16 February 2024

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारात मोफत मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षण ६ चे शुभारंभ !!

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारात मोफत मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षण ६ चे शुभारंभ !!

*मा.नगरसेवक धनंजय गावडे यांच्या हस्ते जल्लोषात उध्दघाटन संपन्न...*

नालासोपारा, प्रतिनिधी, ता १५ :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे, या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने युवती व महिलांना मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर व मेहंदी, केक मेकींग, संगणक प्रशिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, बॅकीग प्रशिक्षण मोफत  दिले जात असून महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत. 

प्रशिक्षणाचे उध्दघाटन दत्त मंदिर समेळपाडा येथे मा.नगरसेवक धनंजय गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे. अनेक महिला घरकामात गुंतलेल्या असतात त्यांना आर्थिकदृष्टया पतीवर अवलंबुन रहावे लागते या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी महिलांना प्रशिक्षण, मोफत देण्यात येते.

महिलाना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतात. आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होते.
हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला  नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने गेले  सहा महिन्यांपासून युवती व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते अशी माहिती शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी  दिली.

शिवणकाम, ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी यांना जिवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मा.नगरसेवक धनंजय गावडे, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, उपशहरप्रमुख श्रीकांत जाधव, उपशाखाप्रमुख सुषमा शहासने, प्रशिक्षक संगिता पासी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...