Friday 16 February 2024

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी !!

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी !!

रायगड, प्रतिनिधी : रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली रसायनी रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तीमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मिक घटना घडत असतात.  त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थितो निर्माण होत आहे. दि. 23 जानेवारी 2024 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समितो महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्याध्यक्ष,श्री.जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, कोळीवाड्याचे सिमाकंन करावे, मच्छिमार बांधवाना उर्वरित डिझेल परतावा मिळावा इतर मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. दि.18 फेब्रुवारी व दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार असून तसेच रायगड पोलीस कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 77 ठिकाणी पुतळा व 23  ठिकाणी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम आयोजित असून एकूण 81 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी शब ए बारात हा मुस्लिम समाजाचा शब ए बारात साजरा करण्यात येणार आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित रहावी तसेच राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षत्राच्या हद्दीत दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी 00.01 वा. ते दि.01 मार्च 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत या कालावधीकरिता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) मधील (अ), (ब), (क), (ङ), (ई) व (फ) प्रमाणे खालील कृत्ये करण्यास या अधिसूचनेदार मनाई करण्यात आली आहे.

शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे काठया किया लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किवा फेकावयाची

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...