Saturday 17 February 2024

शिका, संघटित व्हा, आणि उद्योजक बना, डॉ विनयकुमार राठोड, ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्तांचे सेवालाल जंयतीत प्रतिपादन !

शिका, संघटित व्हा, आणि उद्योजक बना, डॉ विनयकुमार राठोड, ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्तांचे सेवालाल जंयतीत प्रतिपादन !

कल्याण, (संजय कांबळे) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला होता, मात्र समाज शिकला संघटित ही झाला आणि त्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे असे प्रतिपादन ठाणे शहर वाहतुक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले, ते २८५ व्या संत सेवालाल जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डायसाण फाऊंडेशन (NGO) आयोजित २८५ वी संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला संत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड (IPS), ठाणे उत्पादन शुल्क उपायुक्त प्रदिप पवार, सेवा गृपचे मंगल चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंजारा क्रांती दल नंदु पवार, जयभिम आर्मी जिल्हाध्यक्ष शशिकांत जगताप व फाऊंडेशनचे डॉ. अतुल राठोड, वैशाली राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आपल्या प्रमुख भाषणात ते पुढे म्हणाले, डॉ. विनय कुमार राठोड यांनी सांगितले की गोर गरिब, समाजातील युवकांनी अंधश्रद्धेकडे न वळता समय सुचकता दाखवून बदल करणे आवश्यक आहे. शिका, संघटित व्हा आणि उद्योजक बना असा संदेश यावेळी दिला. तसेच इतरही सर्व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळी दिले.

याप्रसंगी विशेष उपस्थिती सुभाष तंवर, सेवानिवृत्त ACP मोहन राठोड, मानव अधिकारी संघटनेचे नागेश कूवेकर, सुजित पगारे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, युवा उद्योजक भुषण राठोड, प्रकाश सुर्यवंशी, सुभाष जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल राठोड यांनी व आभार प्रदर्शन वैशाली राठोड यांनी केले. विषेश आकर्षण नीतू आणि नेमु यांनी गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डायसाण फाऊंडेशनचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...