Sunday 18 February 2024

शिवजन्मोत्सव सत्ताधाऱी धुमधडाक्यात साजरा करीत असताना पन्हाळगडावरील स्वामिनिष्ठ वीर शिवाकाशीद समाधीस्थळावरील भिती शिल्पांची दुरावस्था? बलिदानाचा अपमान?

शिवजन्मोत्सव सत्ताधाऱी धुमधडाक्यात साजरा करीत असताना पन्हाळगडावरील स्वामिनिष्ठ वीर शिवाकाशीद समाधीस्थळावरील भिती शिल्पांची दुरावस्था? बलिदानाचा अपमान?

कल्याण, (संजय कांबळे) ::आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती सोहळयाची सत्ताधा-यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र हे करीत असताना महाराजांना सिद्धी जौहरच्या वेढ्यातून सुखरूपपणे निसटून जाण्यास मदत करणाऱ्या आणि समोर केवळ मृत्यूच आहे हे माहिती असताना वीर शिवा काशीदने स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञकुंडात उडी घेतली व बलिदान दिले, त्या स्वामिनिष्ठ वीररत्न शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाजवळील कोरलेली भितीशिल्पे अंत्यत दुरावस्थेत असून हा बलिदानाचा अपमान नाही का? असा प्रश्न या निमित्तानं इतिहास प्रेमी उपस्थित करत आहेत. 

सध्या राज्यात काय चालू आहे हे सर्वांना माहीत आहे, कालचे भ्रष्टाचारी आज कसे स्वच्छ झाले आहेत हे ते स्वतः व भाजप देखील सांगत आहेत, निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे, त्याच्या आत जे काही करता येईल ते करायचे असा चंगच सत्ताधा-यांनी बांधला आहे, त्यामुळे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षानी घेतला आहे, हा निर्णय जरी चांगला असला तरी याला निवडणुकीचा वास येत आहे,

छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे आहेत की त्यांची जंयती ही राज्यात, देशात नव्हे तर जगात साजरी व्हायला हवी, त्यांचे, विचार, कृती, आचरण, आणि रयतेपरी धोरण हे गुण देखील आपण अंगीकृत करायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यास सिद्दी जौहर ने वेढा दिला होता, कित्येक महिन्यानंतर देखील वेढा काय ढिला होईना, म्हणून महाराजांनी एक अचंबित करणारी युक्ती आखली या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी दोन पालख्या बनविल्या एका पालखीत ते स्वतः व दुसऱ्या पालखीत नेबापूर गावचे न्हावी समाजाचे अगदी हुबेहूब प्रती शिवाजी वाटणारे शिवा काशीद हे बसले ,जौहरला चकवा देण्यासाठी दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करु लागल्या,
इकडे प्रति शिवाजी बनलेल्या वीर शिवा काशीदनी आपले कर्तव्य पार पडले, पण त्यांना सिद्दी जौहरच्या सहकार्यातील काहींनी ओळखले, सिद्दी जौहर संतापला आणि स्वामीनिष्ठ वीर शिवा काशीद सह त्यांच्या इतर सहका-याचा शिरच्छेद केला, याच बलिदानामुळे शिवरायांना सुरक्षितपणे किल्याबाहेर पडण्यास अवधी मिळाला, आजचा सुखी आणि समृद्ध महाराष्ट्र त्यांच्या बलिदानावर उभा आहे, स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद ज्या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहे, तेथे त्यांच्या समाधीस्थळ बांधण्यात आले आहे.

या समाधीस्थळाचे सुशोभीकरण व पाय-या,पेव्हिंग ब्लाँक यासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी  खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत ९ लक्ष, ९९ हजार ९९७ रुपयांचा निधी दिला,

यावेळी समाधीस्थळाच्या वरती मैदानात वीर शिवा काशीद व महाराज यांची काही प्रंसगाची भिती शिल्पे कोरलेली आहेत ,तसेच लेख देखील कोरलेले आहेत, याचे उदघाटन देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते, पर्यटन मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जंयत पाटील, कामगार मंत्री हसण मुश्रीफ, आदी आमदार, खासदार, यांच्या उपस्थितीत झाले होते.

परंतु सध्या या शिल्पांची अवस्था बिकट झाली आहे, रंग उडालेला आहे, मोडतोड झालेली आहे, लेख पुसले गेले आहेत, अशा अवस्थेतील हे दृश्य पाहून राजासाठी बलिदान देणा-या वीर शिवा काशीद यांचा हा अपमान नाही का? शिवाय ज्वाज्वल इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा गडाचे अनेक बुरूज ढासलले आहे, तटबंदी कोसळलेली आहे, यांचे संवर्धन व जतन कोण करणार,? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती चा इलेकशन इव्हेंट करून त्यावर लाखोंची उधळपट्टी करण्यापेक्षा त्यांचा अमुल्य ठेवा, एतिहासाची साक्ष देणारे गड कोट किल्ले,वस्तू संग्रहालय, याचे जतन केले, त्यावर खर्च झाला, तर हजारों वर्षानंतर देखील माझा राजा व त्यांचे मावळे समाजाला,देशाला दिशा देतील, यातून प्रेरणा, उर्जा मिळेल, असे इतिहास प्रेमी दिपक सोरटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...