Friday, 12 December 2025

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

मुंबई (शांताराम गुडेकर)
                स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या “कोकणरत्न” या मानाच्या पदवीसाठी यंदा उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असून यंदाच्या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले आहे.
                हा भव्य सन्मान सोहळा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.यावेळी “कोकणरत्न” पदवीचे वितरण अध्यक्ष श्री संजय कोकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात येईल.

               कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे आणि मुख्य सल्लागार श्री दिलीप लाड यांचे विशेष योगदान लाभले आहे. कार्यक्रमास विशेष सहकार्य युवा नेते सचिन गावडे, बापु परब आणि अजित गोरुले यांनी केले आहे.
              स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा हा उपक्रम कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...