Thursday, 11 December 2025

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !!

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !!

भिवंडी, दि,१२, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या काल्हेर ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या सर्वे नं.२५८ गुरचरण जागेवर अतिक्रम झाल्याचे मोजणीत सिद्ध झाल्याने. आज.गुरुवार दि,११/१२/२०२५ रोजी अनधिकृत अतीक्रमण हटवण्यासाठी गाजावाजा करत दोन पोकलेन यंत्र, पोलिस बंदोबस्त, कर्मचारी वर्ग मागविण्यात आला होते. मात्र सदर अतिक्रमण हटवण्यास माघार घेतल्याने काल्हेर ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरल्याचे दिसल्याने तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी त्यात अर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

         सविस्तर हकीगत अशी की,ग्रामपंचायत काल्हेर यांनी गुरुचरण व स्मशान भूमी जमीन मोजणी साठी उप अधीक्षक भूमी अभिलेख, भिवंडी यांना मोजणीसाठी अर्ज केला होता.त्या अनुषंगाने २३/६/२०२५ रोजी जमीन सर्वे नं. २५१,२५८/१/अ/१ या जमिनीची रोवर मशीनच्या सहाय्याने मोजणी करून हद्द कायम केली होती. त्यात सर्वे नं.२५१ या गुरुचरण व स्मशान भूमी जमिनीवर व सर्वे नं.२५८/१/अ/१ या महाराष्ट्र शासन गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे दोन भव्य इमारतीचे बांधकाम आल्याचे सिद्ध झाले  आहे.
            त्या अनुषंगाने या दोन अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गुरुवार दिं, ११/१२/२०२५ रोजी सकाळी मोठा गाजावाजा करत अतिक्रमण हटवण्यासाठी काल्हेर ग्रामपंचायत कमिटीने सकाळी पोलिस बंदोबस्त, दोन पोकलेन यंत्र, कर्मचारी वर्ग  मागविले होते. मात्र ग्रामपंचायत कमिटी सदर ठिकाणी उपस्थित "न" राहता दुसऱ्याच ठिकाणी या अतिक्रमण संदर्भात मीटिंग घेत होती.त्यामुळे यां ठिकाणी जमलेले ग्रामस्थ, पोलिस ,कर्मचारी वर्ग यांना ताटकळत वाट पाहावी लागली.
         अखेर दुपारी काल्हेर ग्रामपंचायत सरपंचा सौ.आश्लेषा पंकज पाटील, उपसरपंच भरत पाटील, ग्राम विकास अधिकारी रमेश राठोड, सदस्य दयानंद भंडारी व महिला सदस्या हजर झाल्या.या ग्रामपंचायत कार्यालय मार्फत तोडा कारवाईसाठी फक्त मोजकेच सदस्य उपस्थित असल्याने चर्चेचा विषय बनला आहे .
       मात्र बऱ्याच उशिराने एक पोकलेन यंत्र ट्रकमधून खाली उतरवला व अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.फक्त १५ मिनिटातच गरज नसलेल्या इमारतीचे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली होती. मात्र  फक्त एकच खांब (पिलर ) तोडून कारवाईस सुरुवात करताच उपसरपंच भरत पाटील यांनी कारवाई झाल्याचे  घोषित केले व  सर्व ग्रामपंचायत कमिटी तेथून निघून गेली. त्या मुळे तेथे जमलेल्या ग्रामस्थांना, कर्मचाऱ्यांना  धक्काच बसला कारण की, सकाळपासून अतिक्रम हटवण्यासाठी तयारीत असतानाच अचानक हा निर्णय घेतल्याने कोणाच्या दडपणा खाली ग्रामपंचायतीने ही तोडक कारवाई तत्काळ  थांबवली या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
         या थांबवलेल्या तोडक कारवाई बाबत एक शासकीय अधिकारी या नात्याने काल्हेर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री .रमेश राठोड यांनी सरपंच ,उप सरपंच भरत पाटील यांना विचारणा केली पाहिजे होती मात्र तसे " न"केल्याने संशयाला बळकटी मिळाले आहे. 
          ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्या आधी श्री .गोविंद खामकर साहेब गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी श्री.राजू भोसले साहेब पंचायत समिती भिवंडी यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आले होते. त्यामुळे आता ही दोन्ही अधिकारी या थांबलेल्या "अतिक्रमण हटाव" मोहीम  बाबत कोणती कारवाई अथवा कोणता निर्णय घेतात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.जर यांच्या कडून पाठपुरावा अथवा कारवाई "न" झाल्यास एक पत्रकार संघटना  त्या  बाबत मुंबई उच्च न्यायालयात एक "जण हित" याचिका दाखल करणार असल्याचे समजले आहे.
          आता जमीन सर्वे नं,२५१/१ व २५१/२ या गुरुचरण व  स्मशान भूमीच्या जागेवर देखील अतिक्रमण करून अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या असून आता या इमारतीवर ग्रामपंचायत काल्हेर कधी तोडक कारवाई करणार की त्याकडेही दुर्लक्ष करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

( आता आपण अतिक्रमण हटविण्याचे काम थांबवले असून त्यांना अतिक्रमण हटवण्यासाठी १५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.जर त्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटविले नाही तर पुन्हा कारवाई करणार --
उपसरपंच,भरत पाटील, ग्रामपंचायत _काल्हेर)

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...