अनाथ मुलांना विविध प्रमाणपत्र वाटपासाठी ५ मार्चपर्यंत पंधरवड्याचे आयोजन !!
पुणे, प्रतिनिधी : शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनाथ बालकांना आधारकार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड आदी २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत पंधरवडा राबवून वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.
पंधरवडा कालावधीत गरजू अनाथ बालकांनी पंचायत समिती येथील तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, ३ रा मजला, गुलमर्ग सोसायटी, जाधव बेकर्स जवळ, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment