Thursday, 30 May 2024

आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के !!

आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो आंगवली गावातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित 'जनता विद्यालय आंगवली'चा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून या विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या पास होत शाळेला शंभर टक्के निकाल देत संस्थेचा तसेच या शाळेचा नाव उज्वल केले आहे.

             सन २०२३-२०२४ घेण्यात आलेल्या यंदाच्या एस. एस. सी. बोर्डाचा परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे २०२४ रोजी दु.१ वा.सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर माध्यमातून जाहीर झाला. या परीक्षेत जनता विद्यालय आंगवलीची यशस्वी परंपरा कायम राखत येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा शंभर टक्के निकाल दिला आहे .कु.भावेश महेंद्र पवार यांनी -८७. २० टक्के मिळवून प्रथम तर कु.भावेश प्रविण सुर्वे ८४. ८० टक्के गुण मिळवुन द्वितिय, कु.यश बबन जंगम यांनी ७६ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी समाधान कारक गुण संपादित करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विशेष श्रेणी -०५, प्रथम श्रेणी -२०, द्वितिय श्रेणी -१९ तर पास श्रेणी -०३ चा समावेश आहे. तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली अध्यक्ष श्री.संतोष मोरेश्वर दळवी, आजी -माजी पदाधिकारी, विद्यमान उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सल्लागार, सर्वं संचालक आणि प्रशाळेचे मुख्याध्यपक श्री. अजितकुमार रामचंद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग, संस्थेचे संचालक, सदस्य तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आंगवली -सोनार वाडी ग्रामस्थ, मारळ, बामणोली, निवदे, बोंड्ये, कासार कोळवण, वांझोळे, निवे, हातीव ग्रामस्थ, नागरिक यांनी अभिनंदन करून या विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...