Monday 6 May 2024

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंतिम करण्याआधी आपल्या मुलांकडे प्रेम प्रकरणांबाबत चौकशी केल्यास भविष्यात कोणत्याही मुला मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शीतल घोलप यांनी येथे केले. 

    कल्याण पश्चिम येथील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे आयुष मॅट्रिमोनीच्या विद्यमाने  सकल धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासमयी शितल घोलप बोलत होत्या. वधू वर  मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मनोरे यांनी धनगर समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून यापुढेही अनिल काकडे यांनी धनगर समाजाचे मेळावे आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना धनगर समाज नेते श्री. देवराम कंखरे यांनी लग्न जुळवणे अवघड झाले असून वधू वर मेळाव्यामुळे ते काम सोपे झाले असल्याचे स्पष्ट करून यामुळे वेळ आणि पैसा वाचत असल्याने समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.  यासमयी विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर सर्वश्री कौतिकराव बस्ते, रमाकांत पाटील, सतिश हडपे, लालचंद कंखरे , सुनिल वैद्य, प्रतिभा ठोके, सुरेखा बोरसे, संगिता बाविस्कर , अर्चना खांगटे, इत्यादी तर विशेष अतिथी म्हणून सर्वश्री संजय लाळगे, राहुल परदेशी, योगेश घोलप, संजय खांगटे,   रावण धनगर, सुधाकर बाविस्कर, ज्ञानेश्वर काटकर, पन्नालाल कंखरे, दिगंबर भामरे , पंकज मनोरे, गजानन सोनवणे, लता मनोरे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थिती होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक अनिल काकडे यांनी, सूत्रसंचालन समाधान मोरे तर आभार प्रदर्शन विलास तायडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...