Wednesday 12 June 2024

सहा बालके निरीक्षण गृहात दाखल, पालक व नातेवाईक यांना संपर्क साधण्याचे आवाहन !!

सहा बालके निरीक्षण गृहात दाखल, पालक व नातेवाईक यांना संपर्क साधण्याचे आवाहन !!

रायगड, प्रतिनिधी :-- बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. सोबत छायाचित्रातील १) कु. सोनू मनोज कांबळे वय १३ वर्षे २) कु. विजय रामु सिंग वय ०९ वर्षे ०४ महिने ३) कु. राज सुरेश वाघमारे वय १२ वर्षे ०४ महिने, ४) कु. सोनू विजय वय १३ वर्षे ०४ महिने ५) कु. लक्ष्मण संतोष पवार वय १५ वर्षे ११ महिने ६) कु. महेश लक्ष्मण वय १४ वर्षे ०४ महिने आहे.
हे निवेदन प्रसिद्ध झाल्यापासून तीस (३०) दिवसाच्या आत वरील वरील ६ बालकांचे पालक व नातेवाईक यांनी  जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह । बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड ४१०२०१ फोन नंबर ९९७०१२२६२३ या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता :
१) जिल्हा परिवीक्षा संघटना संचालित मुलांचे निरीक्षण गृह / बालगृह कर्जत, ता. कर्जत जि. रायगड संपर्क क्रमांक- ९९७०१२२६२३
२) मा. बाल कल्याण समिती, रायगड
३) जिल्हा महिला व बालविकास विभाग, अलिबाग - रायगड, संपर्क क्रमांक ७७७५०१८१९७ 
येथे संपर्क साधावा.

अन्यथा  बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून मा बाल कल्याण समिती, रायगड यांच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...