Tuesday 25 June 2024

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!


*** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकर नागरिक नाराज 

डोंबिवली, प्रतिनिधी : के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय विनानुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनिअर आणि डिग्री महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता वर्गात बसवून ठेवल्याचा आरोप करत शुक्रवार १४ तारखेला महाविद्यालयाच्या समोर माजी विद्यार्थी राजकीय नेतेमंडळीनी बेमुदत साखळी केले आहे.

या उपोषणात पेंढारकर कॉलेज बचाव मोहिमेचे संयोजक सोनू सरवसे, विशाल शेटे, भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, डोंबिवली शहर उपाध्यक्ष राजू शेख, संदीप शर्मा, शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, गुलाब वझे, बंडू पाटील आदि बेमुद उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी संयोजक सोनू सरवसे म्हणाले, हे कॉलेज अनुदानित आहे. ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. त्याला सरकारी मान्यता नाही. मान्यता नसताना तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाकडून विनाअनुदानित प्रक्रिया राबविणे सुरु आहे. अनुदानित ज्युनिअर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका खोलीत बसविण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे कॉलेजच्या मनमानीविरोधात उपोषण केले. 

यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही उपोषणाकर्त्यांची घेतली भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व माजी विद्यार्थी, शिक्षक संघटना पाठीशी राहून न्याय मिळवून देऊ. शिक्षकांची बाजू घेत या महविद्यालयात प्रशासकीय राजवट लागू करा अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहे.

तर शिवसेनेचे गुलाब वझे म्हणाले, डोंबिवलीत या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. या महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. अनुदानित तुकड्या बंद करण्याची परवानगी मागितली. हे जर डोंबिवलीत झाले तर इतर शहरातहि सुऊ होईल. आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितले. येथे प्रशासकिय राजवट लागू करावी.

या विषयी के.व्ही.पेंढारकर कॉलेज संचालक प्रभाकर देसाई म्हणाले, पेंढारकर महाविद्यालयाबाबत सोशल मीडियावर जे काही बाहेर आले ते आरोप सत्य नाही आणि तसे काही मी मानतही नाही. त्यांच्यावर माझा लेखी व तोंडी आरोप एकच होता की नियमानुसार सात तास शिक्षकांनी शिकवणे अपेक्षित होते. त्यामुळे वेतनात फरक आढळतो. विद्यार्थी येथे उपस्थित राहिले असतील पण विद्यार्थ्यांसाठी त्या दर्जाचे शिक्षक नेमण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि 20-20 पॉलिसी प्रमाणे आम्ही काम करत आहोत.

डोंबिवलीतील नागरिकांशी आमच्या प्रतिनिधीनी संवाद साधला असता पेंढारकर कॉलेज ही डोंबिवलीची अस्मिता व शान आहे, ह्या कॉलेज विषयी घडत असलेल्या या घटनांमुळे मन उन्दिग्न झाले असून यावर लवकर तोडगा निघावा असे मत व्यक्त केले.








No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...